Vijay Wadettiwar : महायुतीचा दीडशे कोटींचा मोबाईल घोटाळा; वडेट्टीवारांच्या आरोपाने खळबळ!
Vijay Wadettiwar : राज्याचे विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार राज्य सरकारवर (Vijay Wadettiwar) तुटून पडले आहेत. अंंगणवाडी सेविकांना मोबाईल आणि अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांना साड्या वाटप करण्याचे सरकारचे नियोजन आहे. याद्वारे मोठा घोटाळा होणार असून या दोन्ही घोटाळ्यांतील वाटा मंत्री आणि सरकारला मिळणार आहे, असा गंभीर आरोप वडेट्टीवार यांनी केला. राज्यात आठ हजार कोटींचा अॅम्ब्यूलन्स घोटाळा गाजत आहे. तोर्यंत सरकारने नवा मोबाईल घोटाळा केला आहे, असा आरोप वडेट्टीवार यांनी केला.
वडेट्टीवार म्हणाले, सरकारमध्ये दोन अलीबाबा आणि 80 चोर आहेत. त्यांच्यात पैसे खाण्याची स्पर्धा सुरू आहे. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेआधी सरकारी तिजोरी लुटून खाण्याचा सरकारचा इराता आता लपून राहिलेला नाही. फक्त पैसे खाण्यासाठीच सरकारने अंगणवाडी सेविकांना मोबाईल देण्याची शक्कल लढवली आहे. अंगणवाडी सेविकांना मोबाईल द्यायचाच असेल तर त्यांच्या खात्यात पैसे जमा करा त्यामुळे भ्रष्टाचार होणार नाही आणि अंगणवाडी सेविकांना पाहिजे तसा मोबाईल घेण्याचीही मुभा सरकारने द्यावी. अंगणवाडी सेविका प्रामाणिक आहेत त्यांच्यावर सरकारचा विश्वास नाही का, असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.
Vijay Wadettiwar : नवीन नवरदेव बाशिंग बांधून तयार; CM बदलांच्या चर्चांवर वडेट्टीवारांचा खोचक टोला
या मोबाईल खरेदीसाठी सरकार 155 कोटी रुपयांना चुना लावणार आहे. हा घोटाळा थांबवायलाच हवा. या खरेदीसाठी सरकार दिल्लीतील कंपनीचा खिसा भरणार आहे. ही कंपनी कुणाच्या जवळची आहे याची चौकशी करावी अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली. अॅम्ब्यूलन्स घोटाळ्याप्रमाणेच सरकारने साडी घोटाळाही केला आहे. अंत्योदय शिधापत्रिकाधारक प्रत्येक कुटुंबाला साडी देण्याची सरकारची योजना आहे. फक्त निवडणुका डोळ्यांसमोर ठेऊन मते मिळवण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.
25 लाख नाही तर एक कोटी साड्यांची खरेदी
राज्य सरकारकडून 25 लाख साड्यांची खरेदी केली जाणार आहे. परंतु, 25 लाख नाही तर एक कोटी साड्या खरेदी केल्या जाणार असल्याची आमची माहिती आहे. सरकारने साड्या खरेदी करण्याऐवजी हे पैसे महिलांच्या सुरक्षेवर खर्च करावेत. या सरकाची पत एवढी खाली आली आहे की, यांना निवडणुकीसाठी साड्या वाटण्याची वेळ आली आहे, अशा शब्दात राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारच्या कारभाराचे वाभाडे काढले.
जितेंद्र आव्हाडांच्या ‘त्या’ वक्तव्यावर विजय वडेट्टीवार म्हणाले, त्यात तथ्य असू शकतं