England complete ban on social media use for children under 16 after Australia : ऑस्ट्रेलियानंतर आता ब्रिटनमध्येही 16 वर्षांखालील मुलांना सोशल मीडिया वापरण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे ब्रिटन अशा प्रकारे 16 वर्षांखालील मुलांना सोशल मिडिया वापरण्यास पूर्णपणे बंदी घालणारा जगातील चौथा देश ठरला आहे.
दरम्यान या अगोदर इंडोनेशिया ऑस्ट्रेलिया मलेशिया आणि आता ब्रिटन या देशांमध्ये 16 वर्षांखालील मुलांना सोशल मीडिया वापरण्यास पूर्णपणे बंदी घालण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यावर ब्रिटनचे पंतप्रधान किर स्टार्मर यांनी सांगितले की, हे पाऊल मुलांच्या उज्जवल भविष्यासाठी उचलण्यात आले आहे. कारण आजकालच्या मुलांच्या जीवनात ते ज्या-ज्या क्षेत्रामध्ये पाऊल ठेवतील तेथे-तेथे तंत्रज्ञान आले आहे. मात्र त्यात स्वत: चे स्थान निर्माण करायचे असल्यास सोशल मीडियापासून लांब राहणं गरजेचं आहे. त्यामुळे मी हा निर्णय घेतला असून मुलांना त्यांचं बालपण पुन्हा देण्याचा हा प्रयत्न आहे.
‘फुलौरी बिना चटणी कैसे बनी’च्या तालावर थिरकणार चाहते; धमाल 4चे नवे गाणे रिलीज होताच व्हायरल
या बंदीमध्ये ऑस्ट्रेलियाच्या ऑस्ट्रेलिया-प्लसच्या धोरणानुसार सुरक्षित प्लॅटफॉर्मवरील लाईव्ह स्ट्रीमिंगही बंद होणार आहे. त्याचबरोबर गेमिंग अॅपवरील मुलांशी अनोळखी लोकांशी संवाद साधण्यावरही बंदी असेल. त्याचबरोबर सोशल मिडिया कर्फ्युच देखील विचार केला जाणार आहे. म्हणजे ठराविक वेळेतच सोशल मिडिया वापरता येईल. मुलांचा ऑनलाईन घातक गोष्टींशी येणारा संपर्क कमी करून होणारे धोके टाळण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.
