Download App

भारतासाठी गुडन्यूज! ब्रिटनबरोबर मुक्त व्यापार करार; हिरे, चांदी अन् स्मार्टफोन्स मात्र वगळले

भारत आणि ब्रिटनने मंगळवारी ऐतिहासिक मुक्त व्यापार करारावर सह्या केल्या. हा मुक्त व्यापार करार दोन्ही देशांसाठी फायदेशीर ठरणार आहे.

India UK Free Trade Agreement : पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Attack) भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव प्रचंड (India Pakistan Crisis) वाढला आहे. पाकिस्तान आणि पीओकेत एअर स्ट्राइक करुन भारताने पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला. या घडामोडी घडत असतानाच भारतासाठी आणखी एक गुडन्यूज आली आहे. भारत आणि ब्रिटनने मंगळवारी ऐतिहासिक मुक्त व्यापार करारावर सह्या केल्या. हा मुक्त व्यापार करार दोन्ही देशांसाठी फायदेशीर ठरणार आहे.

या व्यापारांतर्गत भारत काही वस्तूंवर ब्रिटनच्या उद्योगांनी कोणतीही सूट देणार नाही. यात हिरे, चांदी, स्मार्टफोन्स आणि ऑप्टिकल फायबर या वस्तूंचा समावेश आहे. ब्रिटनमधून आयात होणारे पेट्रोल आणि डिझेल इंजिन वाहनांवरही शुल्कात मर्यादीत सूट मिळेल. दोन्ही देशांनी यावर सहमती दर्शवल्यानंतर हा करार झाला आहे. यानुसार आता दोन्ही देशांत व्यापार होणार आहे.

पिक्चर अभी बाकी है! अर्धसैनिक दलांच्या सुट्ट्या रद्द; हाय अलर्ट जारी, अमित शाहांचे आदेश काय?

मुक्त व्यापार करारानुसार ब्रिटनकडून सवलतीच्या सीमा शुल्कात आयात होणाऱ्या इलेक्ट्रिक वाहनांचा आयात कोटा काही हजारांपर्यंत मर्यादीत आहे. प्लास्टिक, हिरे, चांदी, स्मार्टफोन्स, टेलीविजन कॅमेरा ट्यूब, ऑप्टिकल फायबर बंडल आणि केबल या वस्तूंना करारातून वगळण्यात आले आहे. म्हणजेच या वस्तूंच्या आयातीवर भारताकडून ब्रिटेनला कोणतीही सूट दिली जाणार नाही. ऑटोमोटिव्ह आयात शुल्क 100 टक्क्यांवरुन 10 टक्के होणार आहे. यामुळे टाटा, जेएलआर यांसारख्या कंपन्यांचा फायदा होणार आहे.

या करारामुळे ब्रिटिश कंपन्यांना व्हिस्की, कार आणि अन्य वस्तूंच्या निर्यातीत अडचणी कमी होणार आहेत. यामुळे दोन्ही देशांतील व्यापाराला चालना मिळणार आहे. या काराराचा उद्देश 2030 पर्यंत दोन्ही देशांतील व्यापार दुप्पट करण्याचा आहे. सध्या दोन्ही देशांत 60 अब्ज अमेरिकी डॉलर इतका व्यापार होत आहे. या करारामुळे भारताची ऑटो उत्पादने ब्रिटनच्या बाजारात विकली जाऊ शकतील. तसेच भारतीय ग्राहक ब्रिटनच्या प्रीमियम कार आंतरराष्ट्रीय पातळीवरील दराने खरेदी करू शकतील.

India Pakistan Tension : देशातील इंटरनेट बंद झाल्यास…’ही’ उपकरणे देणार महत्वाचे अपडेट्स

follow us