Download App

Canada News : हा तर निर्लज्ज अन् वेडगळपणा; अमेरिकेतील तज्ज्ञांनी ट्रुडोंना फटकारलं

Canada News : खलिस्तानी अतिरेकी हरदीप सिंह निज्जर याच्या हत्येत भारताचा हात असल्याचा आरोप करत कॅनडाच्या (Canada) पंतप्रधानांनी खळबळ उडवून दिली. मात्र, त्यांच्या या आरोपांनंतर भारत आणि कॅनडा (Canada India Relation) यांच्यातील वादाचा नवा अंक सुरू झाला आहे. ट्रुडो (Justin Trudeau) यांच्या आरोपांनंतर भारत सरकारनेही जशास तसे उत्तर दिले. कॅनडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याची हकालपट्टी केली. त्यानंतर कॅनडा सरकारने आपल्या नागरिकांसाठी ट्रॅव्हल अॅडव्हायजरी जारी करत जम्मू काश्मीरसह पाकिस्तानीला हद्दीला लागून असलेली राज्ये आणि इशान्य भारतातील राज्यात प्रवास टाळण्याचा सल्ला दिला, अशा पद्धतीने हा वाद चिघळत चाललेला असतानाच आता यात अमेरिकेतील आंतरराष्ट्रीय संबंधांच्या अभ्यासकांनी उडी घेत कॅनडाच्या पंतप्रधानांचे कान टोचले आहेत.

भारतानं या प्रकरणात गांभीर्याने लक्ष घालावे यासाठी आम्ही हे केलं असं स्पष्टीकरण ट्रुडो यांनी दिले होते. मात्र, ही निर्लज्ज कृती असल्याचे अमेरिकेतील अभ्यासकांचे मत आहे. अमेरिकेनं (America) या प्रकारात कॅनडाला सहकार्य करू नये असा सल्ला त्यांनी बायडेन सरकारला दिला आहे. हडसन इन्स्टिट्यूटमधील वरिष्ठ अभ्यासक मायकेल रुबिन यांनी एका वाहिनीवरील चर्चेदरम्यान आपले स्पष्ट मत व्यक्त केले.

ज्या लोकांना खलिस्तानी चळवळ त्यांच्या फायद्याची वाटते अशा लोकांच्या मार्गदर्शनाने हे काम कॅनडाचे पंतप्रधान करत आहेत. मात्र, ट्रुडो यांची ही कृती निव्वळ वेडगळ आणि निर्लज्जपणाची आहे. या प्रकरणात अमेरिकेने सावध राहावे आणि कोणत्याही परिस्थितीत ट्रुडो यांच्या बाजूने उभे राहू नये, असे रुबिन म्हणाले.

वाद चिघळला! Canada कडून ट्रॅव्हल अ‍ॅडव्हायजरी; भारतातील असुरक्षित राज्यांचा केला उल्लेख

कॅनडात एका बलुच व्यक्तीची पाकिस्तानच्या मदतीने हत्या करण्यात आली. हे प्रकरण अजूनही प्रलंबित आहे. यामध्ये पोलीस चौकशी करत आहेत. मात्र, यावर ट्रुडो काहीच बोलले नाहीत. हा भेदभाव का केला जात आहे,असा सवाल उपस्थित करत या माध्यमातून ट्रुडो यांना फायदा होईल पण याला नेतृत्व म्हणत नाहीत. भारताच्या प्रकरणात त्यांनी आधिक जबाबदारीने वर्तणूक करायला हवी कारण, ते आता आगीशीच खेळत आहेत, अशा शब्दांत रुबिन यांनी ट्रुडो यांना फटकारले.

Tags

follow us