एका क्षणात होत्याचं नव्हतं, विमान अपघातात दिग्गज खेळाडूसह कुटुंबातील 7 जणांचा मृत्यू
Former professional racing driver Greg Biffle यांच्या कुटुंबासह 7 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये त्यांच्या पत्नी आणि दोन मुलांचा मृत्यू झाला आहे.
7 family members including Former professional racing driver Greg Biffle died in a plane crash : अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलीना येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कारण येथे एक भीषण असा विमान अपघात झाला आहे. त्यामध्ये माजी दिग्गज खेळाडूचा त्याच्या कुटुंबासह 7 जणांसह मृत्यू झाला आहे.
हे एक बिजनेस जेट होते. त्यामध्ये माजी NASCAR रेसिंग ड्रायव्हर ग्रेग बिफल यांच्या कुटुंबासह 7 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये त्यांच्या पत्नी आणि दोन मुलांचा मृत्यू झाला आहे. तसेच इतर देखील 3 लोक यामध्ये मृ्त्यूमुखी पडले आहेत. या घटनेनंतर जगभरातून हळहळ वक्त केली जात आहे.
राहुल कलाटे भाजप प्रवेश : फडणवीसांच्या निर्णयाला शत्रुघ्न काटेंनी विरोध करताच पक्षाचा सूचक इशारा
याबाबत नॉर्थ कॅरोलविना स्टेट हायवे पेट्रोलनुसार हे बिजनेस जेट शार्लोट शहरातील उत्तरेमध्ये असलेल्या स्टेट्सविले एअरपोर्टहून निघाले होते. मात्र टेक ऑफनंतर काहीचवेळात काही तरी गडबड जाणवल्याने पायलटने हे विमान लॅन्ड करण्याचा प्रयत्न केला. मात्र काही वेळातच हे जेट क्रॅश झालं अन् एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं.
आमिर खान प्रोडक्शन्सच्या ‘हॅपी पटेल: खतरनाक जासूस’ या नव्या कॉमेडी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित
ग्रेग बिफल अमेरिकेतली प्रसिद्ध NASCAR रेसिंग ड्रायव्हर होते. त्यांना मोटर स्पोर्टच्या जगात द बिफ नावाने ओळखलं जात होतं. त्यांचा जन्म वॅंकूवरस वॉशिंग्टनमध्ये झाला होता. त्याचं रेसिंग ड्रायव्हर करिअर जवळपास 2 दशकं चाललं त्यांनी Craftsman Truck Series आणि Xfinity Series या दोन्ही चॅम्पियनशिप जिंकून इतिहास रचलेला आहे. ते असे पहिले रेसिंग ड्रायव्हर होते. ज्यांनी या दोन्ही चॅम्पियनशिप जिंकल्या आहेत.
