Download App

Earthquake नंतर तैवान आगीतून फुफाट्यात; 30 लढावू विमानं पाठवत चीनची घुसखोरी

China Intrusion after Taiwan Earthquake : एकीकडे आज सकाळी तैवानची ( Taiwan ) राजधानी तैपेई (Taipei) येथे भूकंपाचे ( Earthquake ) जोरदार धक्के जाणवले. मात्र त्यातून सावरत नाही तोच चीनने तैवानमध्ये घुसखोरी (China Intrusion ) सुरू केली आहे. त्यासाठी चीनची तब्बल 30 लढावू विमानं तैवानमध्ये घुसले आहेत.

Loksabha Election 2024 : बॉक्सर विजेंद्रचा काँग्रेसला अलविदा; ‘पंजा’ सोडून भाजपचं कमळ घेतलं हाती

तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने दावा केला आहे की, तैवानच्या सीमेवर चीनने 30 लढाऊ विमानं आणि नऊ नौसैनिक जहाज पाठवली आहे. तैवानमध्ये भूकंप होण्याच्या एक तासानंतरच चीनकडून ही घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला गेला. चीनची ही गेल्या वर्षभरातील तैवांमधील सर्वात मोठी घुसखोरी असल्याचे सांगितले जात आहे. तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने ट्विट करत ही माहिती दिली. मात्र अद्याप चीनकडून या घुसखोरी बाबत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

दरम्यान भूकंपानंतर तैवानमध्ये केंद्रीय हवामान प्रशासनाने त्सुनामीचा इशारा देखील दिला आहे. या शक्तिशाली भूकंपामुळे शहरात अनेक इमारती कोसळल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. भूकंपामुळे शहरातील अनेक भागांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला होता. तर भूकंपामुळे जीवित वा मालमत्तेचे कोणतेही नुकसान झाले आहे की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

या भूकंपानंतर जपान हवामान संस्थेने (Japan Meteorological Agency) 3 मीटर (9.8 फूट) पर्यंत सुनामी येण्याची शक्यता वर्तवली आहे. भूकंपामुळे शहरातील इमारतींचा पाया हादरला आहे.तर रेल्वे सेवाही बंद करण्यात आली आहे. माहितीनुसार, तैवानमध्ये हा सर्वात शक्तीशाली भूकंप होता.

follow us