DeepSeek AI : एआय म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता. एआयवर अमेरिकेतीचे मक्तेदारी आहे. पण चीनमध्ये (china) तयार झालेल्या DeepSeek या एका एआयने अमेरिकेला मोठा झटका दिलाय. या एआयमुळे अमेरिकेतील एआय कंपन्यांचे स्टॉक कोसळलेत. अमेरिकेला झटका देणारा DeepSeek (डीपसीक) एआय (AI) आहे का, हा एआय कोणी तयार केलाय. त्याचा फायदा काय होणार आहे हे सोपा विषयाच्या माध्यमातून जाणून घेऊया…
DeepSeek चा शोध कुणी लावला ?
डीपसीक या एआय स्टार्टअपची स्थापना हेज फंड आणि एआय इंट्रस्ट्रीजमधील प्रमुख लिआंग वेनफेंग यांनी स्थापन केलीय. वर्षापूर्वीच हे स्टॉर्टअप स्थापन झालेले आहे. या DeepSeek AI च्या टीममध्ये मुख्यत्वे चिनी विद्यापीठातील तरुण, हुशार पदवीधरांचा समावेश होता. गेल्याच आठवड्यात डीपसीक हे AI मॉडेल लाँच केले गेले. डीपसीकची एआय सेवा सुरू झाल्यानंतर chatgpt पेक्षा जास्त त्याचे डाउनलोड झाले आहेत. विशेष म्हणजे अमेरिकेतील मोठी स्वॉफ्टवेअर कंपनी निविडाच्या (Nvidia) चिप्सशिवाय हे एआय तयार झाले. ते पण फक्त 15-20 दशलक्ष डॉलर्स खर्चात. Google, meta, Microsoft ने लाँच केलेल्या AI संशोधनासाठी अब्जावधी डॉलर्सचा खर्च झालाय. या एआयमध्ये हाय लेवल हार्डवेयर वापरले गेलेले नाहीत. तसेच ओपन सोर्स टेक्नोलॉजीचा वापर केलाय. कमी खर्चात तयार झालेल्या या एआयमुळे अमेरिकेतील कंपन्या आणि त्यांच्या खर्चावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालाय.
अमेरिकेतील बाजार कोसळला?
कमी खर्चातील डीपसीक एआय लॉँच झाल्यानंतर लगेच त्याचा फटका अमेरिकेतील एआय कंपन्यांच्या शेअर्सला बसलाय. अमेरिकेचा Nasdaq फ्युचर्स पाच टक्के खाली उघडला आहे. प्रसिद्ध स्वॉफ्टवेअर कंपनी एनविडिया (Nvidia) स्टॉक 12 टक्के घसरला आहे. तर एमआयडीचा शेअर चार टक्के, मायक्रोस्वॉफ्ट सहा टक्के आणि मेटा प्लॅटफॉर्मचे शेअर तीन टक्के घसरले आहेत. त्याचबरोबर जपानमधील टेक कंपन्यांचे शेअर्स पडले आहेत.
OpenAI आणि Google वर परिणाम होणार ?
डीपसीकचा सर्वाधिक परिणाम निविडा (Nvidia) वर झाला आहे. भविष्यात OpenAI आणि Google वरही डीपसीकचा परिणाम होण्याची शक्यता आहे. आमचे मॉडेल केवळ स्वस्तच नाही. तर OpenAI और Meta पेक्षा जास्त कार्यक्षम असल्याचा दावा डीपसीकने केलाय. डीपसीकमुळे एआय इंडस्ट्रीमध्ये मोठ बदल होतील. त्यातून अमेरिकेतील टेक कंपन्या धोक्यात येतील, असे बोलले जात आहे. अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रॅम्प हे चीनवर व्यापार निर्बंध लावण्याच्या तयारीत होते. पण चीनच्या एका एआयने अमेरिकेतील टेक कंपन्या धोक्यात आणल्यात हे नक्की.
#DeepSeek R1 was trained on over 2,000 Nvidia GPUs, which is an impressive technical foundation. However, while the headlines are busy celebrating this so called game changer from the Chinese AI space, it’s worth taking a step back to look at the bigger picture. Artificial… pic.twitter.com/F3FN68xRZb
— George A. Rauscher (@forensicskulls) January 27, 2025