Download App

खलिस्तानावाद्यांच्या घोषणेवर राहुल गांधी म्हणतात, ‘मोहब्बत की दुकान’…; अमेरिकेत नेमकं काय झालं?

  • Written By: Last Updated:

Rahul Gandhi At America :  काँग्रेस नेते राहुल गांधी मंगळवारी, 30 मे रोजी अमेरिकेत पोहोचले. सॅन फ्रान्सिस्कोमध्ये त्यांनी भारतीयांना भेटून संबोधित केले. यावेळी काही लोकांनी राहुल गांधींसमोर खलिस्तानी झेंडे फडकावले आणि खलिस्तानची मागणी करत घोषणाबाजी केली.

राहुल गांधींचे भाषण सुरु असताना खलिस्तान्यांनी घोषणा दिल्या. यावर राहुल गांधींनीदेखील परिस्थिती शांतपणे हाताळत आपला संयम दाखविला व त्यांच्या घोषणांना योग्य ते उत्तर दिले. ‘नफरत के बाजार में मोहब्बत की दुकान…भारत जोड़ो.’, असे म्हणत त्यांनी या घोषणा देणाऱ्यांना उत्तर दिले आहे.

महिला आयोगाची दिल्ली पोलीसांना नोटीस, पीडित मुलीची ओळख उघड कशी झाली?

Aaj Tak शी संबंधित हिमांशू मिश्रा यांनी दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिकास्थित खलिस्तानी संघटना – शीख फॉर जस्टिस (SFJ) ने जबाबदारी स्वीकारली आहे. SFJ प्रमुख गुरपतवंत सिंग पन्नू यांनीही या घटनेचा व्हिडिओ जारी केला आहे. ते म्हणाले की, 1984 च्या शीख दंगलीत काय केले गेले हे सर्वांनी पाहिले आहे? राहुल गांधी अमेरिकेत कुठेही जातील. त्याच्यासमोर खलिस्तान समर्थक शीख उभे राहतील. पन्नूच्या म्हणण्यानुसार 22 जूनला पुढची पाळी नरेंद्र मोदींची आहे.

यावेळी त्यांना देशात सुरु असलेल्या खेळाडूंच्या आंदोलनावर त्यांना प्रश्न विचारण्यात आला. ‘असे अनेक विद्यार्थी आहेत ज्यांना भारतात परत यायचे आहे, देशासाठी काहीतरी करायचे आहे. पण या काळात भारतातील तरुण, खेळाडू आणि कुस्तीपटूंना दिलेली वागणूक पाहिली तर खूप निराशा होते. मग तुम्हीच सांगा की आम्ही भारतात परत जाऊन तिथे काम करण्याचा निर्णय कसा घेऊ?’

“PM मोदी देवालाही शिकवतील की…”; अमेरिकेतून राहुल गांधींनी डागली तोफ

‘भारताबद्दल अनेक दिशाभूल करणाऱ्या गोष्टी बोलल्या जातात. मीडिया जे दाखवतो तसा भारत नाही. माध्यमे एक विशिष्ट कथा दाखवतात. त्याला त्या कथेचे समर्थन करायचे आहे, जे भारतात प्रत्यक्षात घडत नाही. माझ्या भारत जोडो यात्रेदरम्यान हे स्पष्ट झाले होते की, मीडिया फक्त त्या गोष्टी दाखवतो ज्या भाजपला मदत करतात. म्हणूनच मीडिया जे काही दाखवते ते खरे आहे असे समजू नका. तुम्ही तरुण आहात आणि देशाला तुमच्या उर्जेची आणि कौशल्याची गरज आहे. त्यामुळे तुम्ही भारतात परत येण्याचा विचार करत असाल तर नक्की परत या आणि आम्हाला मदत करा, असे राहुल गांधी म्हणाले.

 

 

Tags

follow us