Israel Records 2 Cases Of New Covid Variant : गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या बाधितांमध्ये लक्षणीय घट नोंदवण्यात येत होती. मात्र, आता पुन्हा एकदा जगातील काही देशांमध्ये कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढण्यास सुरूवात केली आहे. त्यात आता इस्त्राइलमध्ये कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचे दोन रूग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा जगाचं टेन्शन वाढलं आहे. भारतात कोरोना रूग्णांसह H3N2 या नव्या विषाणुनंदेखील डोकं वर काढलं आहे. याविषाणुमुळे आतापर्यंत साधारण 5 जणांचा मृत्यू झाला आहे. यात दोनजण महाराष्ट्रातील आहेत.
राज्यावर पुन्हा घोंगावतेय कोरोनाचे संकट; केंद्राने उचलले महत्वपूर्ण पाऊल
प्रकाशित वृत्तांनुसार, इस्रायलमध्ये कोरोनाव्हायरसच्या नव्या व्हेरिएंची दोन दोन प्रकरणे नोंदवली गेली आहेत. इस्रायलच्या आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. लागण झालेला विषाणु फारसा धोकादायक नसल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. हा नवीन व्हेरिएंट कोविड-19 च्या ओमिक्रॉन प्रकारातील BA.1 आणि BA.2 या दोन उप-प्रकारांचे संयोजन आहे.
Pune-Mumbai द्रुतगती मार्गावर भीषण अपघात, तिघांचा दुर्दैवी मृत्यू
नव्या व्हेरिएंटची लागण झालेल्या रूग्णांमध्ये सौम्य ताप, डोकेदुखी आणि स्नायू विकार यांसारखी लक्षणे दिसून आली आहेत. मात्र, याची लागण झाल्यानंतर कोणत्याही विशेष वैद्यकीय उपचारांची गरज लागलेली नाही. इस्रायलच्या 92 लाख लोकसंख्येपैकी 40 लाखांहून अधिक लोकांना कोरोनाव्हायरस लसीचे तीन डोस मिळाले आहेत.
भारतातदेखील पुन्हा एकदा काही राज्यांमध्ये कोराना बाधितांच्या संख्येत वाढ होताना दिसून येत आहे. हा धोका लक्षात घेत केंद्र सरकारकडून सर्व राज्यांना सतर्क राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. तसेच गर्दीच्या ठिकाणी मास्क घालण्याचे आवाहन नागरिकांना आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. त्याता आता इस्त्राइलमध्ये कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचे दोन रूग्ण आढळून आल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, हा विषाणू फारसा धोकादायक नसल्याचे सांगितले जात आहे.