Download App

Dalai Lama : व्हायरल व्हिडिओ प्रकरणी दलाई लामांनी मागितली माफी, म्हणाले…

तिबेटी धर्मगुरु दलाई लामा यांनी एका व्हायरल व्हायरल व्हिडिओ प्रकरणी जाहीरपणे माफी मागितली आहे. व्हिडिओमध्ये मी लहान मुलाची गळाभेट घेऊ शकतो का? असा सवाल केल्याचं स्पष्ट केलंय. या प्रकरणी लहान मुलाच्या किंवा परिवाराच्या भावना दुखावल्या असतील तर मी जाहीरपणे माफी मागू इच्छितो, असं दलाई लामा म्हणाले आहेत. यासंदर्भात दलाई लामा यांनी ट्विट केलं आहे.

दरम्यान, दलाई लामा एरवी ज्या लोकांना भेटत असतात त्यांच्याशी ते आपल्या गंमतीच्या अंदाजात बोलत असतात. त्यांचा स्वभाव कॅमेऱ्यासमोरही असाच असतो. या घटनेबद्दल लामा यांनी दुख: व्यक्त केलं आहे.

सोशल मीडियावर कालपासून हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये दलाई लामा एका लहान मुलाला किस करताना दिसत आहेत. त्यावरुन सोशल मीडियावर काही समर्थक तर काही विरोधकांकडून दलाई लामा यांनी ट्रोल करण्यात येत होतं. अखेर आज त्यांनी जाहीरपणे माफी मागितली आहे.

Gautami Patil : “मला लगीन कराव पायजे”, गौतमी पाटीलला कसा नवरा हवाय? म्हणाली…

दलाई लामा यांनी आधीही महिलांविषयी वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी चर्चेत आले होते. महिला आपली उत्तराधिकारी होणार असेल तर ती आकर्षक असावी, असं वादग्रस्त विधान दलाई लामा यांनी केलं होतं. त्यानंतरही दलाई लामा यांनी चांगलेत चर्चेत आले होते. या वादग्रस्त विधानानंतर त्यांनी जाहीरपणे माफीही मागितली होती.

मंदिराच्या शेडवर झाड कोसळले, चौघांचा मृत्यू, अनेकजण जखमी

दरम्यान, एका युजरने म्हटलं होतं की, जगातील प्रमुख नेत्यांमधील एक असलेले दलाई लामा ट्रेंड करीत असून त्यांनी एका लहान मुलाला आपली जीभ चोखण्यास सांगितलंय. यावरुन हे स्पष्ट होतंय की, आपण अनैतिक युगात प्रवेश केला असन हे वाईट आहे.

तर दुसऱ्या एका युजरने बाल लैंगिक शोषणाच्या आधारे लामा यांच्या अटकेची मागणीही करण्यात आली. हे मी काय पाहत आहे? दलाई लामा यांनी अटक करण्याची गरज असल्याचं युजरने म्हटलं होतं. अखेर तिबेटी धर्मगुरु दलाई लामा यांनी व्हायरल व्हिडिओ प्रकरणी जाहीरपणे माफी मागितली आहे.

Tags

follow us