Breaking! शिवसेना भवन, निधी प्रमुखांना द्या, सर्वोच्च न्यायालयात याचिका…

Supreme Court

एका वकिलाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करत शिवसेना भवन, शिवसेनेच्या सर्व शाखा, शिवसेनेचा निधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला देण्यात यावा, अशी मागणी केली आहे. ही याचिका दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडालीय.

अॅड. आशिष गिरी यांनी ही याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केल्याने खळबळ उडालीय. अॅड. आशिष गिरी शिंदे गटाचे वकील आहेत की नाही? याबाबत अद्याप अस्पष्टता आहे.

सरकारला महाराष्ट्राच्या प्रश्नांशी देणंघेणं नाही, म्हणूनच ते राज्याबाहेर फिरतायेत; जयंत पाटलांची टीका

शिवसेना भवन, सर्व शाखा, सर्व बँकेतील पक्ष निधी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला द्यावा, अशी मागणी आशिष गिरी यांनी याचिकेतून केली आहे. या याचिकेवर येत्या 24 तारखेला सुनावणी करण्याची विनंती गिरी यांनी न्यायालयाला केली आहे. कोर्टाला केली आहे.

दरम्यान, या याचिकेसंदर्भात अद्याप न्यायालयाकडून स्पष्टीकरण देण्यात आलेलं नसून निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती देण्यासाठी ठाकरे गटाने याचिका सादर केली होती.

Horoscope Today, April 10, 2023: ‘या’ राशींना मिळणार भाग्याची साथ! जाणून घ्या काय सांगतय आजचं राशीभविष्य…

या याचिकेसोबत आता पुन्हा नवी याचिका कोर्टात दाखल झाली आहे. त्यामुळे कोर्ट येत्या 24 तारखेला गिरी यांचीही याचिका सुनावणीसाठी घेणार की या याचिकेवर इतर दिवशी सुनावणी ठेवणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

शिवसेना भवनासह इतर मालमत्तांवर मालकी हक्क सांगणार नसल्याचं स्पष्टीकरण शिंदेंकडून करण्यात आलं होतं. मात्र, आज ही याचिका दाखल झाल्याने सर्वांच्याच झोपा उडाल्या आहेत.

Tags

follow us