Download App

Dawood Ibrahim चा खरंच मृत्यू झालाय? ‘तो’ एक स्क्रीनशॉट अन् बातम्यांमागील सत्य…

  • Written By: Last Updated:

Dawood Ibrahim : सोशल मीडियावर मोस्ट वॉन्टेड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम (Dawood Ibrahim) याच्या निधनाच्या बातम्या व्हायरल होत आहेत. असा दावा करण्यात येत आहे की, दाऊद वर पाकिस्तानमध्ये विषप्रयोग केला असून त्याला रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्याचा मृत्यू झाला आहे. दरम्यान अद्याप याची कोणतीही अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही. मात्र रविवारी (17 डिसेंबरला) पाकिस्तानमधील इंटरनेट सेवा खंडित करण्यात आल्यानंतर या बातम्यांना अधिक बळ मिळालं.

विरोधकांना ‘ती’ गोष्ट सहन होईना, विखेंची मंचावरूनच राजकीय फटकेबाजी

सोशल मीडियावर एक स्क्रीनशॉट व्हायरल झाला त्यानंतर या बातम्या सुरू झाल्या. हा स्क्रीन शॉट पाकिस्तानचे काळजीवाहू पंतप्रधान ‘अन्वर उल् हक कक्कर’ यांच्या ट्विटर अकाउंटवरून करण्यात आलेल्या पोस्टचा होता. यामध्ये लिहिलं होतं की, ‘मानवतेचा मसीहा, प्रत्येक पाकिस्तानी नागरिकांना प्रिय असलेला लाडका दाऊद इब्राहिम याचे निधन झालं आहे. त्याला अज्ञात व्यक्तीने विषबाधा केल्याने त्याचा मृत्यू झाला. तर कराचीतील रुग्णालयात त्याने अखेरचा श्वास घेतला. अल्ला त्याला जन्नतमध्ये सर्वोच्च स्थान देवो.’ अशी ही पोस्ट होती.

Dawood Ibrahim : कलाकारांना धमक्या ते बॉलीवूड अभिनेत्रीशी अफेअर? असं होतं दाऊदचं बॉलिवूड कनेक्शन…

मात्र हा स्क्रीन शॉट व्हायरल झाल्यानंतर अशा प्रकारचे ट्विट खरचं करण्यात आलं आहे का? याची तपासणी करण्यात आली असता, पाकिस्तानच्या पंतप्रधानांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर अशा प्रकारची कोणतीही पोस्ट आढळून आलेली नाही. तसेच या व्हायरल पोस्टमध्ये दाखवण्यात आलेलं कक्कर यांचा अकाउंट वेगळे असल्याचा दिसून आलं. तसेच कक्कर यांचे हे अकाउंट फॅन अकाउंट असल्याचे देखील सांगण्यात येत आहे. हे अकाउंट आर्टिफिशियली तयार करण्यात आलं आहे. तसेच त्यावर अधिकृत अकाउंटचे चिन्ह असलेल्या ग्रे कलरची व्हेरिफाय अकाऊंटसाठी असणारी टीक मार्क देखील आहे.

Shah Rukh Khan: किंग खानच्या ‘डंकी’ला सेन्सॉरकडून मिळालं U/A सर्टिफिकेट; किती तासांचा असणार चित्रपट?

दाऊदच्या गुन्ह्यांबद्दल सांगायचं झालं तर मुंबईत 1993 साली घडलेल्या साखळी बॉम्बस्फोटांमध्ये दाऊद मुख्य सूत्रधार होता. या घटनेनंतर भारतीय तपास यंत्रणा त्याच्या शोधात होत्या. मुंबईतील बॉम्बस्फोटात 250 हून अधिक नागरिकांना प्राण गमवावे लागले होते. दहशतवादी कारवायांबद्दल बोलायचे झाल्यास दाऊदचे अल कायदा आणि लष्करसोबतचे संबंधही समोर आले होते. तसेच खंडणीच्या नवीन पद्धती, टार्गेट किलिंग, अंमली पदार्थांची तस्करी यासाठी देखील कुप्रसिद्ध आहे.

Tags

follow us