Download App

दाऊदवर विषप्रयोग! डोंगरीच्या गल्लीतून ‘पाकिस्तानात’ कसा गेला अंडरवर्ल्ड डॉन?

कराची : मोस्ट वॉन्टेड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमवर (Dawood Ibrahim) विष प्रयोग झाला असल्याच्या चर्चा सोशल मीडियामध्ये सुरु आहेत. या चर्चांनुसार त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, दाऊद आजारी पडला किंवा त्याचे निधन झाले अशा स्वरुपच्या चर्चा यापूर्वीही पहिल्यांदाच होताना दिसत नाहीत. दाऊद भारतातून आधी दुबईला आणि नंतर कराचीला गेल्यानंतर अशा स्वरुपाच्या चर्चा अनेकदा झाल्याचे दिसून आले आहे. मात्र काही दिवसांतच त्या अफवा असल्याचे सिद्ध झाले होते. (Discussions are going on in social media that most wanted underworld don Dawood Ibrahim has been poisoned.)

पण दाऊद कराचीपर्यंत पोहचला कसा?

दाऊद इब्राहिम कासकर अर्थात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम. संयुक्त राष्ट्राने घोषित केलेला हा जागतिक दहशतवादी सध्या पाकिस्तानातील कराचीमध्ये राहतो. मुंबईतील डोंगरीच्या झोपडीत जन्म आणि इथल्या गल्ल्यांमध्ये त्याचे बालपण गेले. दाऊद इब्राहिमचे वडील पोलीस कॉन्स्टेबल होते. दाऊद इब्राहिम लहानपणापासूनच चोरी, दरोडे आणि फसवणूक करायचा. 1974 मध्ये वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी दाऊद इब्राहिम मुंबईचा सर्वात मोठा डॉन हाजी मस्तानचा निकटवर्तीय बनला. मात्र, त्यानंतर दाऊद इब्राहिमने मस्तान आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध टोळीयुद्ध सुरू केले.

1981 मध्ये तीन मारेकऱ्यांनी दाऊद इब्राहिम आणि त्याचा भाऊ शब्बीर यांना एका गॅस स्टेशनमध्ये घेरले होते. यादरम्यान शब्बीर मारला गेला तर, दाऊद पळून गेला. पण अवघ्या तीन वर्षांमध्ये दाऊदने त्याचा भाऊ शब्बीरच्या हत्येमध्ये सहभागी असलेल्या तिन्ही मारेकऱ्यांना ठार केले. मुंबई पोलिसांनी दाऊदला मस्तानच्या विरोधात उभे केले. यानंतर हिंसाचार इतका वाढला की त्याला हाताळणे कठीण झाले. त्यानंतर 1984 मध्ये मस्तान दुबईला पळून गेला आणि तिथे तो व्हाईट हाऊस नावाच्या बंगल्यात राहत होता. इथे मुंबईत दाऊदने छोटा राजनसोबत डी. कंपनी चालवायला सुरुवात केली.

Dawood Ibrahim : बॉम्बस्फोट, टार्गेट किलिंग अन्…; दाऊदने भारतात कोण कोणते गुन्हे केले?

भारताने 1991 मध्ये परदेशी उद्योगपतींना देशात गुंतवणूक करण्याची परवानगी दिली. जपानी टीव्ही किंवा चायनीज रेडिओसारख्या गोष्टी कायदेशीररित्या खरेदी केल्या जाऊ लागल्या. हळुहळू मुंबईत दाऊदचे साहित्य घेऊन येणाऱ्या जहाजांची संख्या कमी होत गेली. त्याच वर्षी पोलीस आणि डी कंपनीच्या सदस्यांमध्ये जोरदार चकमकी झाल्या. बाबरी मशीद पाडल्यानंतर 1993 मुंबईत 13 बॉम्बस्फोट झाले. या बॉम्बस्फोटात सुमारे 250 लोकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर, एफबीआय आणि इंटरपोलने डॉनला त्यांच्या मोस्ट वाँटेड यादीत टाकले आणि अटक टाळण्यासाठी त्याला दुबईला पळून जावे लागले.

यानंतरच त्याने पाकिस्तानातील सर्वात मोठे शहर कराचीमध्ये आश्रय घेतला. NDTV च्या रिपोर्टनुसार दाऊद इब्राहिमला 2003 मध्ये भारत आणि अमेरिकेने जागतिक दहशतवादी घोषित केले होते. 1993 च्या बॉम्बस्फोटात त्याच्या कथित भूमिकेसाठी त्याच्या डोक्यावर $25 दशलक्ष बक्षीस ठेवण्यात आले होते. पाकिस्तानातील हाफिज सईदची प्रतिबंधित संघटना लष्कर-ए-तैयबाने 2008 मध्ये मुंबईवरील 26/11 चा हल्ला घडवून आणला होता. ताजमहाल हॉटेलच्या चार दिवसांच्या वेढासह मुंबईभर दहशतवाद्यांनी बॉम्बस्फोट घडवून आणले. यामध्ये अनेक नागरिक मारले गेले.

‘अमोल कोल्हेंनी त्यांनी अंतकरनातून टीका केली नाही….’; अमोल मिटकरींचं सुचक वक्तव्य

एस्क्वायर मॅगझिनने आतल्या सूत्रांचा हवाला देत वृत्त दिले होते की, दाऊदनेही या हल्ल्याची योजना आखली होती. आता डी कंपनी आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी संघटना बनली आहे. दक्षिण आशिया व्यतिरिक्त, डी कंपनी देखील काही आफ्रिकन देशांसाठी डोकेदुखी बनली आहे कारण दाऊदने ईशान्य नायजेरियामध्ये स्थित संयुक्त राष्ट्रांनी नियुक्त केलेल्या बोको हराम या दहशतवादी संघटनेमध्येही गुंतवणूक केली आहे.

Tags

follow us