‘कोल्हेंना बोलायला लावलं असेल’,अमोल मिटकरींचं थेट विधान; रोख कुणाकडे?
Amol Mitkari : राष्ट्रवादीत (NCP) फुट पडल्यानंतर शरद पवार गट आणि अजित पवार (Ajit Pawar) गटात मोठा संघर्ष पाहायला मिळत आहे. सध्या राष्ट्रवादी कुणाची यावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. दरम्यान, दोन्ही गटांकडून एकमेंकावर टीकेची झोड उठवली जाते. अशातच काल पनवेलमधील स्वाभिमानी मेळाव्यात शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हेंनी अजित पवार गटावर बोचरी केली. दरम्यान, आता कोल्हेंनी(Amol Kolhe) केलेल्या टीकेला अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरींनी प्रत्युत्तर दिलं.
PM Modi : ‘तुम्हाला वाटतयं मी इन्कम टॅक्स पाठवेल’; दिव्यांग विद्यार्थ्याला असं का म्हणाले मोदी?
आज माध्यमांशी बोलतांना अमोल मिटकरींना कोल्हेंनी केलेल्या टीकेविषयी विचारले असता ते म्हणाले की, शिरूर मतदारसंघात अमोल कोल्हेंना कोणी मदत केली हे त्यांना चांगलंच ठाऊक आहे. त्यामुळे कोल्हेंनी काल (दि.17) केलेल्या विधानावर मला पूर्ण विश्वास आहे की, कोल्हे अंतरमनातून बोलले असतील असं मला वाटत नाही तर, त्यांना बोलायला लावलं असेल असे थेट विधान अजितदादा गटाचे आमदार अमोल मिटकरींनी केले आहे. त्यामुळे त्यांचा रोख नेमका कुणाकडे होता असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. तसेच कोल्हे जर बोलले असतील, तर त्यांना अजित पवारांनी काय काय मदत केली? हे मी स्वतः आपल्या समोर येऊन सांगेल, असं मिटकरी म्हणाले.
Actress Tanuja: अभिनेत्री तनुजा यांची तब्येत खालावल्याने रुग्णालयात दाखल; आता कशी आहे प्रकृती?
पवारांच्या विधानावर काय म्हणाले मिटकरी?
पनवेल येथे पार पडलेल्या मेळाव्यात शरद पवारांनी अजून मी म्हातारा झालेलो नाही, असं वक्तव्य केले होते, त्यावर बोलताना मिटकरी म्हणाले की, पवार साहेबांचं वय 83 वर्ष असून, शरीर चिरकाल साथ देत नसतं, त्यादृष्टीनेच अजितदादांनी त्यांना आराम करण्याचा सल्ला दिला असेल. शरद पवार कार्यकर्त्यांशिवाय जगू शकत नाही, त्यांना फिरण्याचा अधिकार असून, ते मोठे नेते आहेत, त्यांच्यावर मी अधिक भाष्य करणं योग्य ठरणार नाही.
भुजबळ, जरांगेना केली विनंती
मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून छगन भुजबळ आणि मनोज जरांगे यांच्यात सध्या जोरदार शाब्दिक वाद सुरू आहे. यावर बोलताना मिटकरी म्हणाले की, दोन समाज विचलित होतील असे कोणतेही वक्तव्य करू नये अशी विनंती छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील या दोघांनाही आहे. मोठ्या प्रमाणात कुणबी समाजाचे दाखले मिळत आहेत त्यामुळे कुणबी समाज आणि ओबीसी समाज नामशेष होईल का? अशी भीती भुजबळांना आहे. त्यामुळे शिंदे समिती बरखास्त करण्याची मागणी भुजबळांनी केली असेल असे मिटकरी म्हणाले. ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला न्याय मिळावा ही आमच्या पक्षाची भूमिका आहे. स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सुद्धा तेच सांगितले असून, मराठा समाजाला न्याय देण्याचा आम्ही प्रयत्न करू, असं मिटकरी म्हणाले.