PM Modi : ‘तुम्हाला वाटतयं मी इन्कम टॅक्सवाले पाठवेल’; दिव्यांग विद्यार्थ्याला असं का म्हणाले मोदी?

PM Modi : ‘तुम्हाला वाटतयं मी इन्कम टॅक्सवाले पाठवेल’; दिव्यांग विद्यार्थ्याला असं का म्हणाले मोदी?

PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी त्यांच्या मतदारसंघ वाराणसीचा दोन दिवसीय दौरा केला. यावेळी रविवारी (17 डिसेंबरला) सुरुवातीला त्यांनी कटिंग मेमोरियल इंटर कॉलेज या ठिकाणी विकसित भारत संकल्प यात्रेमध्ये सहभाग नोंदवला. यावेळी अनेक लाभार्थ्यांशी संवाद साधला. तर एका विद्यार्थ्याशी त्यांचा मिश्किल संवाद रंगला होता. त्यावेळी त्यांनी या विद्यार्थ्याला त्याचं इन्कम विचारलं. तसेच त्याला ते म्हणाले की, इन्कम सांगितलं तरी चालेल. मोदी तुमच्याकडे इन्कम टॅक्स पाठवणार नाही.

Actress Tanuja: अभिनेत्री तनुजा यांची तब्येत खालावल्याने रुग्णालयात दाखल; आता कशी आहे प्रकृती?

यावेळी पंतप्रधान मोदी या दिव्यांग विद्यार्थ्यांशी बोलताना म्हणाले की, तुमचं शिक्षण किती झालं आहे. त्यावर विद्यार्थी म्हणाला की, एम कॉम झालं आहे. आता स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे. तसेच या लाभार्थी दिव्यांग विद्यार्थ्याने सांगितले की, मला पेन्शन देखील मिळते. दुकान चालवण्यासाठी देखील अर्ज केला आहे. स्टेशनरी साहित्य विक्री करण्यासाठी मी हे दुकान सुरू केलं आहे. माझ्या दुकानात दिवसभरात दहा-बारा लोक येतात.

नागपूर-अमरावती महामार्गावर अपघात, CM शिंदेंनी ताफा थांबवत जखमींना नेलं रग्णालयात

यावर पंतप्रधान मोदी यांनी या विद्यार्थ्याला महिनाभराचे कमाई विचारली. यावेळी या विद्यार्थ्याला सांगता आली नाही. त्यावर पंतप्रधान मोदी यांनी मिश्किलपणे म्हटले की, ‘नका सांगू कुणी इन्कम टॅक्स अधिकारी येणार नाही. तुम्हाला असं वाटतं की मोदी इन्कम टॅक्सच्या लोकांना पाठवतील. तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद सांगतो की, तुम्ही चांगलं कमावत असाल.’ यावर या विद्यार्थ्याने म्हटलं की हा आनंद मोदी यांना भेटल्याचा आहे.

दरम्यान सध्या भाजपकडून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी तयारी सुरू झाली आहे या अंतर्गत खासदारांच्या कामाचा लेखाजोखा घेतला जात आहे यामध्ये रविवारी पंतप्रधान मोदी यांनी देखील त्यांच्या मतदारसंघांमध्ये विकास कामांचं उद्धाटन केलं. तसेच विविध योजनांच्या लाभार्थ्यांशूी संवाद साधला. त्यांच्याकडून प्रत्यक्षपणे योजनेचा लाभ मिळाला आहे. की, नाही याची विचारपूस केली. सध्या मोदींच्या या संभाषणाचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज