Download App

Iran and Israel War : इराणला अण्वस्त्र पुरवण्यास अनेक देश तयार, रशियाच्या माजी अध्यक्षांचा दावा

अनेक देश आता इराणला अण्वस्त्र पुरवण्यास तयार असल्याचा मोठा दावा रशियाचे माजी अध्यक्ष दिमित्री मेदवेदेव (Dmitry Medvedev) यांनी केला आहे.

  • Written By: Last Updated:

Dmitry Medvedev : इराण आणि इस्रायलमध्य (Iran and Israel War) सुरू असलेल्या युद्धात अमेरिकेनेही (America) उडी घेतली. आज सकाळी अमेरिकेने इराणच्या तीन अणुस्थळांवर हल्ला केला. त्यामुळं इस्रायल-इराण मधील संघर्ष आणखीन वाढण्याची शक्यता आता निर्माण झाली. दरम्यान चीन, पाकिस्तानसह आदी देशांनी या हल्ल्याचा निषेध केला. तर अमेरिकेने (America) केलेल्या हवाई हल्ल्यानंतर अनेक देश आता इराणलाण्वस्त्र पुरवण्यास तयार असल्याचा मोठा दावा रशियाचे माजी अध्यक्ष दिमित्री मेदवेदेव (Dmitry Medvedev) यांनी केला आहे. यासंदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिले आहे.

आता ग्रामपंचायतींची परीक्षा! स्वच्छता अन् मुलभूत सुविधांचा पेपर तयार; जाणून घ्या, कशी होणार तपासणी? 

मेदवेदेव यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटलं की, फोर्डो, नतान्झ आणि इस्फहान येथील स्थळांना लक्ष्य करताना अमेरिकेची कारवाई केवळ आपले उद्दिष्ट साध्य करण्यात अपयशी ठरली नाहीत, तर प्रत्यक्षात उलट परिणाम झाला. पण इराणमधील अणु केंद्रांवर रात्रीच्या वेळी केलेल्य हल्ल्यांमुळे अमेरिकन लोकांनी काय मिळाले?, असा सवाल त्यांनी विचारला आहे.

दिमित्री यांनी असा दावा केला की, अणु इंधन चक्रातील महत्त्वाच्या पायाभूत सुविधांवर कोणताही परिणाम झाला नाही किंवा त्यांना फक्त किरकोळ नुकसान झालं असेल. तसेच आपण स्पष्टपणे म्हणू शकतो की भविष्यात अणु शस्त्राचे उत्पादन सुरूच राहील. तसेच अनेक देश इराणला स्वतःची अण्वस्त्र थेट पुरवण्यास तयार आहेत, असा दावा देखील त्यांनी केला.

वारीच्या पालख्यांमुळे रस्ता जाम होतो, आझमींचे वादग्रस्त विधान, फडणवीसांनी केली सडकून टीका 

इराणला देशांतर्गत मजबूत पाठिंबा
इराणची राजकीय व्यवस्था टिकून राहिली आहे आणि बहुदा ती आणखीन मजबूत झाली. या हल्ल्यामुळे इराणला देशांतर्गत पाठिंबा मजबूत करण्यास मदत झाली आहे. लोक देशाच्या नेतृत्वभोवती एकत्र येत आहेत, असंही ते म्हणाले.

मेदवेदेव यांनी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची खिल्ली उडवली. एकेकाळी शांततेचे अध्यक्ष म्हणून गौरवले जाणारे ट्रम्प आता अमेरिकेला दुसऱ्या युद्धात ढकलत असल्याचं ते म्हणाले.

इराणला स्व-संरक्षणाचा अधिकार
अमेरिकेने या अणु प्रकल्पांवर केलेल्या हल्ल्यांचा निषेध पाकिस्तानने केला आहे. या हल्ल्यांद्वारे अमेरिकेने आंतरराष्ट्रीय कायद्यांचे उल्लंघन केलं असून इराणला स्वसंरक्षणाचा हक्क असल्याचंही पाकिस्तानने म्हटलं आहे. आणि त्याच्यावरील असे हल्ले कोणत्याही प्रकारे समर्थनीय ठरू शकत नाहीत, असं पाकने म्हटलं.

follow us