जर मंगळवारी रात्री 8 वाजेपर्यंत करार झाला नाही, तर चार तासांत इराणचा…, ट्रम्प यांची पुन्हा धमकी

Donald Trump : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी पुन्हा एकदा इराणला धमकी दिली आहे. मंगळवारी रात्री 8 पर्यंत इराणने एखाद्या

Donald Trump

Donald Trump

Donald Trump : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी पुन्हा एकदा इराणला धमकी दिली आहे. मंगळवारी रात्री 8 पर्यंत इराणने एखाद्या करारावर सहमती दर्शवली नाही तर अवघ्या चार तासांत इराणला पूर्णपणे उद्ध्वस्त करणार असा इशारा डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला दिला आहे.

वॉशिंग्टनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना ट्रम्प (Donald Trump) म्हणाले की, आमच्याकडे एक योजना आहे ज्याला आमच्या लष्करी सामर्थ्याचा भक्कम पाठिंबा आहे आणि या योजनेनुसार इराणमधील (Iran) प्रत्येक पूल (मंगळवार) रात्री 12 वाजेपर्यंत पाडला जाईल. इराणमधील प्रत्येक वीज प्रकल्प बंद केला जाईल, जाळून टाकला जाईल, स्फोटाने उडवून दिला जाईल आणि कायमचा निकामी केला जाईल. थोडक्यात सांगायचे तर, मध्यरात्रीपर्यंत ते पूर्णपणे उद्ध्वस्त झालेले असतील आणि जर आम्ही तसे ठरवले, तर हे काम अवघ्या चार तासांतही पूर्ण केले जाऊ शकते असं पत्रकार परिषदेत बोलताना डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.

करारासाठी रात्री 8 वाजेची अंतिम मुदत

या पत्रकार परिषदेत बोलताना ट्रम्प म्हणाले की, मंगळवारी ‘ईस्टर्न टाईम’नुसार रात्री 8 वाजेपर्यंत अमेरिकेशी एखादा करार करावा आणि तेलाच्या अखंड पुरवठ्यासाठी ‘हॉर्मुझची सामुद्रधुनी’ (Strait of Hormuz) पुन्हा खुली करावी नाही तर अमेरिका इराणवर हल्ले करणार.

इराणकडून 45 दिवसांच्या युद्धविराम प्रस्तावाचा स्वीकार करण्यास नकार

ट्रम्प यांनी असा दावा केला की, इराणमधील जनतेचीच अशी इच्छा आहे की त्यांनी आणखी हल्ले करावेत तसेच स्वातंत्र्याच्या प्राप्तीसाठी कोणत्याही प्रकारचा त्रास सहन करण्यास ती जनता तयार आहे.

आज कोणाला लाभ होईल आणि कोणाला नुकसान? जाणून घ्या 7 एप्रिलचे राशीभविष्य-

ट्रम्प यांनी पुढे सांगितले की, जर इराणने एखाद्या कराराला सहमती दर्शवली, तर अमेरिका त्या देशाच्या पुनर्बांधणीमध्येही मदत करू शकेल. आम्ही त्यांच्या राष्ट्राच्या पुनर्बांधणीच्या कामातही सहभागी होऊ शकतो. इराणने 45 दिवसांच्या युद्धविराम प्रस्तावाचा स्वीकार करण्यास नकार दिला आहे हा संघर्ष कायमस्वरूपी संपुष्टात यावा, अशी आपली इच्छा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

Exit mobile version