Download App

लज्जास्पद! डोनाल्ड ट्रम्प यांची भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’वर पहिली प्रतिक्रिया

Donald Trump Call Shame Full To Indian Military Strikes On Pakistan : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’वर (Operation Sindur) पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी भारत आणि पाकिस्तानमधील तणावाची परिस्थिती ‘लज्जास्पद’ असल्याचं म्हटलंय. मंगळवारी संध्याकाळी ओव्हल ऑफिसमध्ये एका समारंभात ट्रम्प म्हणाले (Indian Military Strikes On Pakistan) की, नुकतेच कळले की भारताने पाकिस्तानवर हल्ला केला आहे.

हल्ला (India Pakistan Tension) अत्यंत लज्जास्पद असल्याचं ट्रम्प यांनी म्हटलंय. आम्ही याबद्दल आत्ताच ऐकलंय. भारत अन् पाकिस्तान बऱ्याच काळापासून लढत आहेत. ही परिस्थिती लवकरच संपेल, अशी अपेक्षा देखील डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली आहे.

Operation sindoor गाजलं, सोबत सोफिया कुरेशी आणि व्योमिका सिंग या दोन नावांचा बोलबाला

जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले आहेत. तर दुसरीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तान दोघांनाही तणाव कमी करण्याचं आवाहन केलंय. भारताने म्हटलंय की, ही कारवाई मर्यादित आणि गैर-लष्करी होती. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्याने सांगितले की, ते परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

‘ मानवतेच्या भल्यासाठी …’ ऑपरेशन सिंदूरनंतर काही तासांतच PM मोदींच्या हस्ते जागतिक अंतराळ परिषदेचं उद्घाटन

भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी अमेरिकन अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि भारताची भूमिका स्पष्ट केली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तर भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाला लज्जास्पद म्हटलंय.

अमेरिकेने 2021 मध्ये अफगाणिस्तानातून माघार घेतल्यानंतर त्याचे महत्त्व कमी झाले असले तरी, चीनच्या वाढत्या प्रभावाचा सामना करण्याचे उद्दिष्ट असलेले वॉशिंग्टनसाठी भारत हा अमेरिकेचा एक महत्त्वाचा भागीदार आहे, तर पाकिस्तान हा एक मित्रपक्ष राहिला आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो म्हणाले की, ते परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. तसेच वॉशिंग्टन शांततापूर्ण तोडगा काढण्यासाठी आशियाई शेजारी देशांशी संपर्क साधत आहेत.

 

follow us