Download App

तब्बल 350 टक्के टॅरिफ! भारत नाही अमेरिकाच करतोय वसुली; ‘या’ अहवालातून ट्रम्प यांचा खोटारडेपणा उघड

India US Trade Donald Trump : अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी अखेर भारतावर 25 टक्के टॅरिफ आकारण्याची घोषणा केली. हा कर 1 ऑगस्टपासून लागू केला जाणार आहे. या टॅरिफसह भारताकडून दंडही वसूल केला जाणार आहे. रशियाकडून तेल खरेदी आणि डिफेन्स एक्सपोर्टमुळे (India Russia Trade) दंड आकारण्यात येणार आहे. भारत जगात सर्वाधिक टॅरिफ आकारतो असे वक्तव्य डोनाल्ड ट्रम्प यांनी (Tariff War) या निर्णयाची माहिती देताना केले होते. परंतु, त्यांचं वक्तव्य काही खरं नाही. बहुदा त्यांच्याकडे माहिती कमी असावी. जागतिक व्यापार संघटनेच्या (WTO) एका रिपोर्टमध्ये वेगळीच माहिती आहे.

बिजनेस टुडेमध्ये व्यापार संघटनेचा (World Trade Organization) एक रिपोर्ट प्रसिद्ध करण्यात आला आहे. या रिपोर्टनुसार अमेरिका काही खास वस्तूंच्या आयातीवर सर्वाधिक टॅरिफ वसूल करतो. अमेरिकेच्या या टॅक्सच्या तुलनेत जगातील दुसरा कोणताही देश (India US Trade) पुढे नाही. यामध्ये डेअरी प्रॉडक्ट्स, तंबाखू आणि खाद्यपदार्थांचा समावेश आहे. देशांतर्गत व्यापाराचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने अमेरिका सरकार हा कर अन्य देशांकडून वसूल करतो. दुसरीकडे भारत सरासरी 17 टक्के टॅरिफ आकारतो. ट्रम्प यांनी केलेल्या आरोपाच्या तुलनेत हा टॅक्स खूप कमी आहे.

अमेरिकेने भारताला डिवचले! पाकिस्तानसोबत तेल कराराची हातमिळवणी, ट्रम्प सरकारचा दुटप्पी निर्णय?

अमेरिका तब्बल 350 टक्के टॅरिफ आकारतो

जागतिक व्यापार संघटनेच्या रिपोर्टनुसार अमेरिका तंबाखूवर 350 टक्के, डेअरी प्रॉडक्टसवर 200 टक्के आणि फळे, भाजीपाला, धान्य या वस्तूंवर 130 टक्क्यांपेक्षा जास्त टॅरिफ आकारतो. तर भारत सरकार व्हिस्की आणि वाईनवर 150 टक्के तसेच काही ऑटोमोबाइल पार्ट्सवर 125 टक्के टॅरिफ आकारते. जपानचा विचार केला तर जपान सरकार तांदळावर तब्बल 400 टक्के टॅरिफ आकारते तर कोरिया काही वस्तूंवर 887 टक्के टॅरिफ आकारतो. भारतावर आरोप करताना ही आकडेावारी ट्रम्प यांच्या लक्षात आली नसावी किंवा त्यांनी याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले असावे.

आकडेवारीत मोठी तफावत

व्यापाराच्या आकडेवारीत काही तफावत दिसून येते. सन 2024 मध्ये अमेरिकेने भारताकडून 87.4 अब्ज डॉलर्सची आयात केली अशी माहिती दिली होती. पण भारताने मात्र 80.7 अब्ज डॉलर्सच्या वस्तूंचीच आयात केली होती. म्हणजेच दोन्ही देशांच्या आकडेवारीत 6.7 अब्ज डॉलर्सची तफावत दिसून येते. याआधी 2023 मध्ये 8 अब्ज डॉलर्सची तफावत दिसून आली होती.

भारताचे वाणिज्य आणि महसूल विभाग या विसंगती दूर करण्यासाठी काम करत आहेत. इकॉनॉमिक टाइम्सच्या एका रिपोर्टमध्ये एका अधिकाऱ्याने सांगितले की जागतिक डेटाबेस भारताने दिलेल्या टॅरिफच्या आकडेवारीवर अवलंबून असतात. तर अमेरिकेचे आकडेवारी साधारणपणे जागतिक व्यापार संघटनेकडून घेतली जाते. त्यामुळे दोन्ही देशांतील व्यापारबाबत वेगवेगळी माहिती समोर आली आहे.

मोठी बातमी! अमेरिका भारतावर २५% कर लादणार, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली घोषणा

follow us