Download App

आयफोन निर्मितीसाठी भारतच फायद्याचा ; डोनाल्ड ट्रम्प यांना वृत्तपत्राने कसे तोंडावर पाडले ?

अमेरिकेतील न्यूयॉर्क टाइम्सच्या एका रिपोर्टने अमेरिकेत आयफोन (iphone factory) निर्मिती कशी सोपी नाही हे मांडले आहे. त्यात कारणेही दिलीत.

  • Written By: Last Updated:

Donald Trump can not snatch iphone factory,New York times Report: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) हे सध्या जगावर दबाव निर्माण करण्यासाठी धडाकेबाज निर्णय घेतायत. काही दिवसांपूर्वी भारत, चीनसह अनेक देशांवर मोठा टॅरिफ (आयात शुल्क) लावले होते. तर भारतात (
) तयार होणाऱ्या आयफोनवरून अॅपल कंपनीला त्यांनी थेट सवाल केले होते. भारतात आयफोन निर्मितीचे कारखाने उभारण्यापेक्षा अमेरिकेत हे कारखाने उभारावेत. देशातील लोकांना रोजगार मिळत नसेल तर कंपन्यांचा काय फायदा ? असा सवाल करत अॅपलने स्थानिक लोकांना रोजगार द्यावी, अशी भूमिका ट्रम्प यांची होती. पण आता अमेरिकेतील न्यूयॉर्क टाइम्सच्या (New York times) एका रिपोर्टने डोनाल्ड ट्रम्प यांना तोंडावर पाडले. त्यात अमेरिकेत आयफोन निर्मिती कशी सोपी नाही हे या रिपोर्टमध्ये मांडले आहे.


आता रुग्णालयाच्या खर्चाची चिंता नाही, अ‍ॅडमिट झाल्यानंतर दररोज मिळणार पैसे, काय आहे हॉस्पिटल डेली कॅश स्कीम ?

फॉक्सकॉन भारतात आयफोन असेंबल करण्याचे काम करत आहे. कोरोना काळापूर्वी आयफोन मोठ्या प्रमाणात चीनमध्ये बनवले जात होते. कोरोनामुळे पुरवठा साखळीवर मोठा परिणाम झाला. एकाच देशावर अवलंबून राहण्याचा फटका अॅपलला बसला. त्यानंतर अॅपलने भारताकडे मोर्चा वळविला. काउंटरपॉइंट रिसर्चच्या अहवालानुसार या वर्षाच्या सुरुवातीपर्यंत जगभरात विकले जाणारे 18 टक्के आयफोन भारतात बनवले जात होते. तर या वर्षाच्या अखेरीस 30 टक्के आयफोन भारतात बनविले जाणार आहेत. (Donald Trump cant snatch iphone factory,New York times Report)

भाजपला धक्का, आमदार टी.राजा यांनी दिला राजीनामा; कारण काय?


बेंगळुरूचा प्रकल्प का महत्त्वाचा ?

बेंगळुरूतील देवनहल्ली येथील फॉक्सकॉनचा प्लांट पूर्णपणे लवकरच सुरू होईल. सध्या त्याच्या फक्त एकाच भागात काम सुरू आहे. सध्या येथे आठ हजार लोक काम करतात. जेव्हा कंपनी पूर्णपणे उभारली जाईल तेव्हा हा आकडा चाळीस हजार असेल. न्यूयॉर्क टाईम्सच्या वृत्तानुसार, भारतात प्लांटसाठी जमीन मिळणे आता सोपे झाले आहे. लोकांना नोकऱ्याही सहज उपलब्ध होत आहेत. एवढेच नाही तर अनेक तैवानी, अमेरिकन आणि दक्षिण कोरियन कंपन्यांनी फॉक्सकॉनजवळ प्लांट उभारले आहे. जे त्यांना सुटे भाग विकतात.


एका कंपनीने रुप पालटले

देवनहल्ली हे एक उदाहरण आहे. एखादी कंपनी एखाद्या परिसराचे संपूर्ण चित्र कसे बदलू शकते. दोन ते तीन वर्षांपूर्वा हा भाग पूर्णपणे ओसाड होता. स्थानिक लोकांना रोजगारासाठी बेंगळुरूसह अनेक शहरांमध्ये जावे लागत होते. आता परिस्थिती पूर्णपणे बदललीय. फॉक्सकॉनने आयफोन बनवण्यासाठी येथे तिनशे एकरवर प्लांट उभारलाय. इतर काही कंपन्या जमीन खरेदी करत आहेत. या घोषणेनंतर, देश आणि जगातील प्रसिद्ध रिअल इस्टेट आणि बहुराष्ट्रीय कंपन्या देवनहल्लीमध्ये पोहोचल्या आहेत. परिस्थिती अशी आहे की येथील जमिनीच्या किमती चारशे टक्कांपेक्षा जास्त वाढल्यात. अपार्टमेंट, व्हिला आणि प्लॉंटचे 57 मेगा प्रोजेक्ट सुरू आहेत. बारा कंपन्या, अनेक आंतरराष्ट्रीय शैक्षणिक संस्था, शाळा आणि रुग्णालये यांनी काम सुरू केले आहे.

follow us