‘मी खामेनीला मृत्यूपासून वाचवले…’अमेरिका राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा

Donald Trump On Ayatollah Ali Khamenei : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 12 दिवसांपासून सुरु असणाऱ्या इराण आणि इस्त्रायल युद्धादरम्यान मोठी घोषणा करत सीजफायरची घोषणा केली होती. तर आता डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी मोठा दावा केला आहे. इराण आणि इस्त्रायल (Iran and Israel) युद्धादरम्यान इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी (Ayatollah Ali Khamenei) यांना मृत्यूपासून वाचवले असा दावा ट्रम्प यांनी केला आहे. आम्ही खमेनींवर हल्ला करण्याची परवानगी देऊ शकत होते मात्र आम्ही तसे केले नाही. असा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे.
त्यांनी शुक्रवार 27 जून रोजी डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म टृुथ वर एक पोस्ट करत दावा केला आहे. या पोस्टमध्ये ट्रम्प यांनी लिहिले की, खामेनी कुठे आहे याची मला माहिती होती मात्र मी इस्त्रायली आणि अमेरिकन सैन्याला त्यांचा जीव घेण्याची परवानगी दिली नाही. त्यामुळे मी त्यांना एका भयानक मृत्यूपासून वाचवले आहे. असा दावा ट्रम्प यांनी या पोस्टमध्ये केला आहे.
तर दुसरीकडे इराण आणि इस्त्रायल यांच्यात झालेल्या सीजफायरनंतर खामेनी यांनी आपण युद्ध जिंकले असं बोलले होते मात्र आता यावर ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी याबाबत लिहिले की, तथाकथित ‘सर्वोच्च नेते’ अली खामेनी यांनी निर्लज्जपणे आणि मूर्खपणे सांगितले की त्यांनी इस्रायलविरुद्ध युद्ध जिंकले आहे. ते असे का बोलत आहेत… जेव्हा त्यांना माहित आहे की त्यांचे विधान खोटे आहे. असे घडलेले नाही, तेव्हा त्यांनी खोटे बोलू नये.
ट्रम्प यांनी असाही दावा केला की युद्धाच्या शेवटच्या टप्प्यात इस्रायली विमानांचा एक खूप मोठा ग्रुप तेहरानच्या दिशेने जात होता. परंतु त्यांनी इस्रायलला विमाने परत आणण्याचे आवाहन केले. या घटनेवर त्यांनी लिहिले, कदाचित हा शेवटचा पराभव असता. खूप नुकसान झाले असते आणि अनेक इराणी मारले गेले असते. हा आतापर्यंतच्या युद्धातील सर्वात मोठा हल्ला असणार होता. असा दावा देखील त्यांनी या पोस्टमध्ये केला आहे.
राज्यातील सर्वात मोठे भंगार केंद्र एसटीच्या जागेवर उभारले जाणार; मंत्री प्रताप सरनाईकांची घोषणा
अमेरिका पुन्हा इराणवर हल्ला करेल का? तर 27 जून रोजी व्हाईट हाऊसमध्ये पत्रकार परिषदेत अमेरिका पुन्हा इराणवर हल्ला करणार का? असा प्रश्न विचारला असता ट्रम्प म्हणाले की, जर गुप्तचर यंत्रणेकडून इराण युरेनियम चिंताजनक पातळीपर्यंत समृद्ध करु शकतो तर आम्ही इराणवर हल्ला करणार असं ट्रम्प म्हणाले.