Donald Trump Decision transgender no entry in women sports : डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची (Donald Trump) शपथ घेतल्यानंतर खळबळ उडवून देणारे निर्णय घेतले आहेत. त्यांनी प्रचारामध्ये जी जी अश्वासन दिली ती ती त्यांनी पुर्ण करण्याचा जणू धडाकाच लावला आहे. त्यात आता त्यांनी प्रचारामध्ये म्हटल्या प्रमाणे देशात दोनच जेंडर असणार.
सकाळी लग्न… दुपारी सप्तपदी, संध्याकाळी नवरीनं ठोकली धूम, लग्नाची स्टोरी व्हायरल
त्यानुसार आता देशातील ट्रान्सजेंडर आणि एलजीबीटीक्यू समुदायाच्या अडचणी वाढल्या आहेत. कारण आता महिलांच्या खेळात तृतीयपंथीयांना नो एन्ट्री असणार आहे. असा निर्णय ट्रम्प यांनी घेतला आहे. ट्रम्प यांनी आदेश जारी केला आहे. त्यानुसार आता मुली आणि महिलांच्या खेळांमध्ये तृतीयपंथी अॅथलेट्स सहभागी होऊ शकणार नाही. मात्र यामध्ये जन्माच्या वेळेस महिलांची नावे असणारे तृतीय पंथांना सहभागी होता येणार आहे. त्यामुळे लिंग बदलून महिला झालेल्या पुरूषांना देखील यामध्ये मनाई असणार आहे.
सोयाबीन खरेदीसाठी मुदतवाढ द्या, अन्यथा संसदेबाहेर आंदोलन करणार; निलेश लंके आक्रमक
तसेच या अगोदर त्यांनी लिंग बदलाच्या शस्त्रकियेवर देखील निर्बंध लादले आहे. त्यानुसार आता 18 वर्ष वय पुर्ण नसलेल्या मुला मुलींना लिंग बदलाच्या शस्त्रकिये करणे कायद्याने गुन्हा असणार आहे. त्यातून लिंग बदलावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न आणि समलैंगिकतेतून समाजात निर्माण होणाऱ्या समस्यांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
दुसरीकडे ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची (Donald Trump) शपथ घेतल्यानंतर खळबळ उडवून देणारे निर्णय घेतले आहेत. यात कर्मचारी कपातीचाही समावेश आहे. संघीय सरकारमधून कर्मचारी कपातीच्या मोहिमेला सुरुवात झाली आहे. याअंतर्गत सरकारकडून कर्मचाऱ्यांना देण्यात आलेल्या बायआऊट ऑफरचा स्वीकार करण्यात आला आहे. या ऑफरचा स्वीकार करून जवळपास 40 हजार कर्मचाऱ्यांनी नोकरीतून राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे.