Download App

Donald Trump Inauguration : चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिपनिंग यांना शपधविधीचं निमंत्रण…

डोनाल्ड ट्रम्प यांचा शपथविधी येत्या 20 जानेवारीला पार पडणार असून चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिपनिंग यांनाही या शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आल्याची माहिती समोर आलीयं.

Donald Trump Inauguration : अमेरिकेच्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत बाजी मारल्यानंतर आता येत्या 20 जानेवारीला डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा अमेरिकेच्या राष्ट्रपतिपदावर विराजमान (Donald Trump Inauguration) होणार आहेत. 20 जानेवारीला त्यांचा शपथविधी पार पडणार असून त्यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिपनिंग यांना या शपथविधी सोहळ्यासाठी आमंत्रित केलं असल्याची माहिती वृत्तसंस्थांकडून देण्यात आलीयं.

राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याचा भीषण अपघात; पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू, सुरक्षा एजन्सीवर प्रश्न

अमेरिकेच्या राष्ट्रपतीपदाची निवडणूक पार पडल्यानंतर ट्रम्प यांनी नोव्हेंबर महिन्यातच शी जिपनिंग यांना आमंत्रित केलं. मात्र, जिपनिंग यांनी आमंत्रण स्विकारलं की नाही याबाबत चीनी दुतावासाचे प्रवक्त्यांकडून कोणत्याही प्रकारचं स्पष्टीकरण आलेलं नाही. येत्या 20 जानेवारीला जगभरातील नेत्यांच्या प्रमुख उपस्थितीत शपथविधीचा सोहळा पार पडणार आहे. त्यामुळे आता शी जिपनिंग या शपथविधीला सोहळ्याला हजर राहणार की नाही? याबाबत अद्याप तरी अस्पष्टताच आहे.

पैशाच्या जोरावर लोकशाही विकत घेण्याचा प्रयत्न म्हणजे ऑपरेशन लोटस; पटोलेंचा हल्लाबोल

डोनाल्ड ट्रम्प यांनी 2024 च्या निवडणुकीत बाजी मारुन पुन्हा एकदा ऐतिहासिक राजकीय पुनरागमन केलंय. ट्रम्प यांनी 2024 च्या निवडणुकीत 295 इलेक्टोरल मते मिळवून, 226 मते मिळविलेल्या डेमोक्रॅटिकच्या उमेदवार कमला हॅरिस यांचा पराभव करून युनायटेड स्टेट्सचे अध्यक्ष म्हणून दुसऱ्यांदा विजय मिळवलायं. दरम्यान, अमेरिकेतील व्हाईट हाऊसमध्ये इतिहासात दुसऱ्यांदा ट्रम्प हे राष्ट्रपती म्हणून जाणार आहेत. याआधी ग्रोवर क्लीवलैंड यांचं उदाहरण होतं, त्यांनी 1884 आणि 1892 मध्ये राष्ट्रपती म्हणून हाईट हाऊसमध्ये प्रवेश केला होता. तर ट्रम्प हे 2016 ते 2020 पर्यंत अमेरिकेच्या राष्ट्रपती पदावर होते.

काही दिवसांपूर्वीच चीनमधून आयात होणाऱ्या वस्तूंवरील आयात शुल्काबाबत डोनाल्ड ट्रम्प यांनी धमकी दिली होती. तसेच यूएस सरकारने TikTok च्या चिनी मूळ कंपनी ByteDanceला सोशल मीडिया ॲप विकण्यासाठी किंवा अमेरिकेत निर्बंधांना सामोरे जाण्यासाठी उद्घाटनाच्या पूर्वसंध्येला 19 जानेवारी ही अंतिम मुदत निश्चित केलीयं. वृत्तसंस्थांच्या माहितीनूसार, TikTok सध्या न्यायालयात बंदीच्या विरोधात लढा देत असून मागील आठवड्यात बंदी अविरोधित करण्याचा प्रयत्न गमावल्यानंतर, ते सर्वोच्च न्यायालयात अपील करत आहेत.

follow us