Download App

डॉलर सोडला तर 100 टक्के टॅरिफ, ट्रम्प यांचा ‘ब्रिक्स’ला इशारा; भारताची डोकेदुखी वाढणार?

अमेरिकी डॉलरऐवजी दुसऱ्या चलनाचा स्वीकार केला तर 100 टक्के टॅरिफ लावू असा इशारा डोनाल्ड ट्रम्प यांनी ब्रिक्स देशांना दिला आहे.

Donald Trump Warns BRICS Nations : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी (Donald Trump) पुन्हा एकदा ब्रिक्स देशांना स्पष्ट इशारा दिला आहे. अमेरिकी डॉलरऐवजी दुसऱ्या चलनाचा स्वीकार केला तर 100 टक्के टॅरिफ लावू असा इशारा ट्रम्प यांनी दिला आहे. डोनाल्ड ट्रम्प सोशल मीडियावर पोस्ट लिहीत ब्रिक्स देशांना सरळ शब्दांत इशारा दिला आहे की जर या देशांनी दुसरे चलन स्वीकारले तर अमेरिका या देशांची साथ नक्कीच सोडील. दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांच्या या भूमिकेने भारताची डोकेदुखी वाढणार आहे. ब्रिक्स संघटनेत चीन आणि रशियाबरोबरच भारतही सदस्य देश आहे. त्यामुळे ट्रम्प यांचा इशारा भारतासाठी नक्कीच चिंताजनक आहे.

युक्रेन युद्ध थांबणार? युक्रेनला मिळणारी मदत अमेरिका रोखणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय

ब्रिक्स देश आता डॉलरपासून दूर जाण्याचा प्रयत्न करत आहेत. या शत्रूतापूर्ण देशांकडून आम्हाला असे आश्वासन हवे आहे की त्यांच्याकडून कोणतेही नवे ब्रिक्स चलन वापरले जाणार नाही किंवा अमेरिकी डॉलरऐवजी दुसऱ्या चलनाचा ते स्वीकार करणार नाहीत. अन्यथा त्यांना 100 टक्के टॅरिफचा सामना करावा लागेल. अमेरिकी अर्थव्यवस्थेत नवीन चलन विक्रीची स्वप्ने या देशांनी पाहू नयेत.

आंतरराष्ट्रीय व्यापार किंवा अन्य कोणत्याही ठीकाणी ब्रिक्स अमेरिकी डॉलरची जागा घेऊ शकत नाही. जो देश असा प्रयत्न करेल त्याला टॅरिफचा सामना करावा लागेल असा इशारा डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला. डोनाल्ड ट्रम्प यांनी याआधीही ब्रिक्स देशांना इशारा दिला होता. मागील आठवड्याच ओवल ऑफीसमध्ये स्वाक्षरी समारोहात ट्रम्प यांनी माध्यमांशी संवाद साधला. जर ब्रिक्स देश असे काही करू इच्छित असतील तर ठीक आहे. आम्ही अमेरिकेबरोबरील त्यांच्या व्यापारावर 100 टक्के टॅरिफ लावू. या वक्तव्याचा अर्थ धमकी घेऊ नये स्पष्ट भूमिकेच्या रुपात याकडे पाहिलं पाहिजे.

डोनाल्ड ट्रम्प यांना झटका! वादग्रस्त नागरिकता आदेशावर न्यायालयाकडून स्थगिती

दरम्यान, सन 2023 मध्ये ब्रिक्स देशांच्या शिखर संमेलनात रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतिन यांनी डी-डॉलरायजेशनचे आवाहन केले होते. ब्रिक्स देशांना आता राष्ट्रीय मुद्रांचा विस्तार करावा लागेल तसेच बँकांमधील सहकार्य वाढविण्यावर भर द्यावा लागेल. जून 2024 मध्ये ब्रिक्स देशांच्या परराष्ट्र मंत्र्‍यांनी रशियातील निजनी नोवगोरोड याठिकाणी एममेकांची भेट घेतली होती. द्विपक्षीय व्यापार, बहुपक्षीय व्यापार आणि आर्थिक देवाणघेवाणीत स्थानिक चलनाचा वापर वाढविण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले होते.

follow us