डोनाल्ड ट्रम्प यांना झटका! वादग्रस्त नागरिकता आदेशावर न्यायालयाकडून स्थगिती
Donald Trump News : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेताच डोनाल्ड ट्रम्प अॅक्शन (Donald Trump) मोडमध्ये आले. त्यांनी एकापाठोपाठ एक निर्णय घेण्यास सुरुवात केली. काही निर्णयांचे जनतेने स्वागत केले तर काही निर्णय मात्र कायद्याच्या कचाट्यात सापडले आहेत. अशाच एका निर्णयाला न्यायालयाने रोखून धरक डोनाल्ड ट्रम्प यांना जोरदार झटका दिला आहे. वॉशिंग्टनचे जिल्हा न्यायाधीश जॉन कॉफनर यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या बर्थ राइट आदेशाच्या अंमलबाजवणीवर स्थगिती आणली आहे. हा आदेश पूर्णपणे असंवैधानिक आहे आणि धोरणांना लागू होण्यापासून रोखत असल्याने यावर प्रतिबंधाचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. यांतर डोनाल्ड ट्रम्प यांनी न्यायालयाच्या या आदेशाविरुद्ध अपील करू असे म्हटले आहे.
ट्रम्प यांचा एक निर्णय! पाकिस्तान फसला, अफगाणी अडकले; नेमकं काय घडलं?
CNN च्या रिपोर्टनुसार फेडरल कोर्टाचे जस्टीस जॉन कॉफनर यांनी वॉशिंग्टन राज्याचे अटॉर्नी जनरल निक ब्राउन आणि डेमोक्रेटिक नेतृत्वातील राज्यांची विनंती स्वीकारली. कायदेशीर आव्हान देण्यासाठी 14 दिवसांसाठी आदेश रोखला जावा. ज्यावेळी या आदेशावर सही करण्याचा निर्णय घेण्यात आला त्यावेळी वकील कुठे होते असा सवाल जस्टीस कॉफनर यांनी विचारला. न्यायालयाच्या या निर्णयावर राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पत्रकारांनी याबाबत विचारलं असता ट्रम्प म्हणाले आम्ही न्यायालयाच्या या निर्णयाविरुद्ध नक्कीच अपील दाखल करू.
अमेरिकेच्या संविधानातील 14 व्या संशोधनानुसार अमेरिकेच्या जमिनीवर जन्माला येणाऱ्या सर्व मुलांना नागरिकतेची हमी मिळते. इतकेच नाही तर दुसऱ्या देशांतून येथे स्थायिक झालेल्या लोकांच्या मुलांनाही नागरिकतेचा अधिकार मिळतो. परंतु, डोनाल्ड ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे देशात जन्माला येणाऱ्या मुलांच्या नागरिकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे असे वकील लेन पोलोजोला यांनी सांगितले.
या आदेशामुळे भविष्यात काय नुकसान होऊ शकते याचा विचार ट्रम्प प्रशासनाने केला नाही. नुकसान व्हावे हाच या आदेशाचा उद्देश असावा असे आता वाटत आहे. जन्मसिद्ध नागरिकता समाप्त केल्यामुळे राज्यांचे सर्व कार्यक्रमांवर वित्तीय भार वाढेल अशी भीती आता व्यक्त करण्यात येत आहे. यानंतर आता राष्ट्रपती डोनाल्ड काय भूमिका घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
दक्षिण सीमेवर आणीबाणी, थर्ड जेंडर संपले; शपथविधीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांच्या 13 मोठ्या घोषणा