Download App

धमकी खरी ठरली! राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवाराची भर सभेत गोळ्या घालून हत्या; देशभरात खळबळ

इक्वाडोर: भ्रष्टाचाराविरुद्ध बोलण्यासाठी ओळखल्या जाणारे नेते आणि इक्वेडोरच्या राष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार फर्नांडो विलाव्हिसेन्सिओ यांची एका भर सभेत निघृण हत्या करण्यात आली आहे. इक्वाडोरमध्ये हिंसाचाराच्या लाटेदरम्यान राजधानी क्वेटोत एका राजकीय सभेत अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या गोळ्या झाडल्या. 20 ऑगस्टला इक्वाडोरमध्ये अध्यक्षीय निवडणुका पार पडणार आहेत. (Ecuadorian presidential candidate Fernando Villavicencio was shot and killed Wednesday at a political rally)

अध्यक्ष गिलेर्मो लासो यांनी फर्नांडो विलाव्हिसेन्सिओ यांनी या हत्येचा निषेध करत यामागे संघटित गुन्हेगारी असल्याचा संशय व्यक्त केला. लासो यांनी एका निवेदनात म्हटले की, मी तुम्हाला खात्री देतो की हे गुन्हेगार लवकरच गजाआड असतील. देशात संघटित गुन्हेगारी खूप पुढे गेली आहे, परंतु त्यांना कायद्याचा धाक बसवला जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.

मोठी बातमी! मध्यरात्री पाकिस्तानची संसद बरखास्त; सरकारचा कार्यकाळही संपुष्टात

मिळालेल्या माहितीनुसार, व्हिलाव्हिसेन्सियो यांच्यावर क्वेटो येथील हायस्कूलमध्ये एक सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेतून बाहेर पडताना अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या तीन गोळ्या झाडल्या. यात गोळी डोक्यात लागल्याने ते गंभीर जखमी झाले होते. हल्ल्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

इम्रान खान यांच्या अटकेनंतर भेटवस्तूंचा लिलाव: जमा होणारी रक्कम गरीबांना वाटणार

दरम्यान, हल्लेखोर घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाला असून त्यानंतर झालेल्या गोंधळात जनरल मॅन्युएल इंग्वेझ आणि 9 जण जखमी झाले आहेत. विलाव्हिसेन्सिओ यांच्या निधनानंतर संपूर्ण देशभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.ते भ्रष्टाचाराविरुद्ध सर्वात मोठा आवाज होते.विशेषत: अध्यक्ष राफेल कोरिया यांच्या 2007-2017 सरकारच्या काळात त्यांनी भ्रष्टाचाराविरोधात मोठी लढाई लढली होती.

मिळालेल्या माहितीनुसार हत्येपूर्वी विलाव्हिसेन्सिओ यांनी आपल्याला मेक्सिकोच्या सिनालोआ कार्टेलच्या नेत्यांकडून अनेक जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. या नेत्यांचा सध्या इक्वाडोरमध्ये कार्यरत असलेल्या आंतरराष्ट्रीय संघटित गुन्हेगारी गटांपैकी एक आहे. इक्वेडोरमध्ये ड्रग कार्टेलच्या हिंसक गुन्हेगारीत आणि हत्येच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर लासो यांनी संघटित गुन्हेगारीशी संबंधित खुनांच्या घटनांनंतर तीन प्रांतांमध्ये आणीबाणी आणि रात्रीच्या कर्फ्युची घोषणा केली होती.

Tags

follow us