Elon Musk launch new feature for users : मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटरचे सीईओ एलॉन मस्क यांनी ट्विटरची मालकी घेतल्यानंतर अनेक धक्कादायक निर्णय घेतले आहेत. यामध्ये युझर्सच्या व्हेरीफाईड अकाऊंटची ओळख असलेल्या ब्लू टीक बाबात त्यांनी गेल्याकाही दिवसांपूर्वीच महत्त्वाचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता त्यांनी आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. एलॉन मस्क यांनी आता ट्विटर युझर्ससाठी नवं फिचर आणलं आहे. त्यांच्या घोषणेमुळे पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.
Twitter Blue Verified subscribers can now upload 2 hour videos (8GB)!
— Elon Musk (@elonmusk) May 18, 2023
मात्र त्यांची ही घोषणा युझर्ससाठी फायद्याची असणार आहे. कारण गेल्या काही दिवसांपूर्वीच मस्क यांनी युझर्संना ब्लू टीकसाठी पैसे आकारले होते त्यानंतर आता याच ब्लू टीकसाठी सबस्क्रिप्शन घेणाऱ्या युझर्संना एलॉन मस्क यांनी एक गिफ्ट दिलं आहे. हे म्हणजे आता हे युजर्स आपल्या ट्विटर अकाऊंटवर तब्बल 2 तासांची व्हिडीओ अपलेड करू शकणार आहेत.
Sushama Andhare यांना मारहाण केल्याचा दावा, ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाची पक्षातून हकालपट्टी
मस्क यांनी स्वतः ट्विट करत याबद्दलची माहिती दिली. त्यांनी या ट्विटमध्ये म्हटले की, ट्विटरच्या ब्लू टीकचं सबस्क्रिप्शन घेणारे युझर्सं आता आपल्या ट्विटर अकाऊंटवर तब्बल 2 तासांची व्हिडीओ अपलेड करू शकणार आहेत. हे व्हिडीओ 8 जीबी पर्यंत असतील. असं देखील त्यांनी यावेळी म्हटलं.
दरम्यान गेल्या काही दिवसांपूर्वीच त्यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला होता. आपण ट्विटरचं सीईओ पद सोडणार असल्याचं त्यांनी सांगितलं होत. त्यानंतर एका महिलेकडे त्यांनी आपल्या पदाचा पदभार सोपवला आहे.