Sushama Andhare यांना मारहाण केल्याचा दावा, ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाची पक्षातून हकालपट्टी
Beating to Sushma Andhare in Beed : शिवसेना (UBT) च्य उपनेत्या सुषमा अंधारे यांना बीडमध्ये मारहाण केल्याचा दावा केलेले जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांच्यावर पक्षाकडून कारवाई करण्यात आली आहे. पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत जाधव यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. सुषमा अंधारे दादागिरी करत आहेत, पदाधिकाऱ्यांकडून पैसे मागत आहेत, माझे पदही विकत आहेत, असा आरोप करत अंधारे यांना दोन कानशिलात लगावल्या असल्याचा दावा जाधव यांनी केला होता.
ठाकरे गटाच्याच नेत्याची सुषमा अंधारेंना मारहाण, बीडमधील धक्कादायक प्रकार
नेमका काय घडला आहे प्रकार?
आप्पासाहेब जाधव यांनी एक व्हिडीओ शेअर करत घडलेल्या प्रकाराबाबत माहिती दिली. ते म्हणाले, बीडमध्ये ठाकरे गटाच्या प्रबोधन यात्रेचं आयोजन करण्यात आले आहे. यावेळी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत देखील उपस्थित राहणार आहेत. शनिवारी ही सभा होणार आहे. या पार्श्वभूमीवर सभेच्या तयारीची पाहणी करण्यासाठी ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांसह उपनेत्या सुषमा अंधारे देखील आल्या होत्या.
अंधारे सध्या जिल्ह्यात दादागिरी करत आहेत. आमच्या पदाधिकाऱ्यांकडे पैसे मागत आहेत. एसी, फर्निचर, सोफ्यासाठी त्या पैसे मागत आहेत. त्या माझं पदही विकायला लागल्या आहेत. मी पक्ष वाढीसाठी रात्र अन् दिवस मेहनत करत आहे, रक्ताच पाणी करत आहे, हाडाची काडं करत आहे. माझ्या लेका-बाळाच्या मुखातील पैसे खर्च करुन पक्ष वाढवत आहे. पण त्यावर त्यांचं लक्ष नाही. यातूनच सुषमाताई अंधारे आणि माझ्यात बाचाबाची झाली. याच वादातून मी त्यांना दोन चापटा मारल्या, अशी कबुली बीडमध्ये ठाकरे गटाचे शिवसेना जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव यांनी दिली.
Tuljapur News: प्रचंड टिकेनंतर तुळजाभवानी मंदिराची माघार; कपड्यांचा निर्णय बदलला
घडलेल्या प्रकारावर सुषमा अंधारे काय म्हणाल्या?
सुषमा अंधारे यांनी ही शिंदे गटाची स्क्रिप्ट असल्याचा आरोप केला आहे. तसेच आप्पासाहेब जाधव हे निष्क्रिय कार्यकर्ते आहेत. तसेच त्यांना या अगोदरच्या सभेला लोकांची गर्दी जमवता आली नव्हती. मात्र मी एक महिला असूनही एक प्रबोधन यात्रा यशस्वी करून दाखवली याची सल त्यांना असेल. आता त्यांना काय उत्तर द्यायचं या उद्विगणतेतून त्यांनी मला मारहाण झाल्याचा दावा केला असल्याचं सुषमा अंधारे म्हाणाल्या.