Elon Musk Launched America Party : अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचे (Donald Trump) एकेकाळचे सहकारी एलन मस्क आता त्यांच्या (Elon Musk) विरोधात आहेत. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मस्कने सन 2024 मधील अमेरिकी राष्ट्रपती निवडणुकीत ट्रम्प यांना सर्वात मोठे राजकीय दान दिले होते. सरकार आल्यानंतर ट्रम्प यांनी सुद्धा मस्क मोठी जबाबदारी दिली होती. पण वन बिग ब्युटीफूल बिलावरून दोघांत संघर्ष सुरू झाला.
या बिलामुळे अमेरिकेच्या कर्जात वाढ होईल असा मस्क यांचा दावा होता. जर हे विधेयक मंजूर झाले तर दुसऱ्याच दिवशी नवा राजकीय पक्ष स्थापन करू असा इशारा मस्कने दिला होता. झालंही तसंच. मस्कने ‘द अमेरिका पार्टी’ नावाने नवा राजकीय पक्ष स्थापन केला आहे. चला तर मग जाणून घेऊ या की अमेरिकेत एकूण किती राजकीय पक्ष आहेत? तिथे राजकीय पक्ष कसा स्थापन केला जातो?
अमेरिकेत भारताप्रमाणे अनेक राजकीय पक्ष आहेत. या पक्षांचा इतिहास बराच जुना आहे. सद्यस्थितीत अमेरिकेत बहुपक्षीय व्यवस्था आहे. यामध्ये डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिकन पक्ष प्रभावी आहेत. या व्यतिरिक्त रिफॉर्म, लिबरटेरियन, सोशलिस्ट, नॅचरल लॉ, कॉन्स्टिट्युशन आणि ग्रीन पक्ष आहेत. हे पक्ष देखील राष्ट्रपती निवडणुकीत (Presidential Elections) भाग घेत असतात.
अमेरिकेत निवडणूक प्रक्रिया द्विपक्षीय व्यवस्था म्हणून ओळखली जाते. याचा अर्थ असा नाही की तिथे फक्त दोनच पक्ष आहेत. याचा अर्थ असा की रिपब्लिक आणि डेमोक्रॅटिक पक्ष अमेरिकी सरकारमधील तिन्ही टप्प्यांत राजकीय रूपाने प्रभावी आहेत. अन्य राजकीय पक्षांना थर्ड पार्टी असे संबोधले जाते.
डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्णय घेतलाच! ‘या’ 14 देशांवर नवीन टॅरिफचा भार; दिवसही ठरला..
भारतातील निवडणूक आयोगाप्रमाणेच अमेरिकेतही फेडरल इलेक्शन कमिशन (Federal Election Commission) आहे. भारतात ज्या पद्धतीने नवीन राजकीय पक्षांची नोंदणी निवडणूक आयोगाकडून केली जाते त्याच पद्धतीने अमेरिकेतही नवीन राजकीय पक्षाची नोंदणी फेडरल इलेक्शन कमिशनमध्ये करावी लागते.
संबंधित राजकीय पक्षाच्या विस्ताराच्या हिशोबाने त्याला राष्ट्रीय किंवा प्रादेशिक पक्षाचा दर्जा भारतात दिला जातो. त्याच पद्धतीने अमेरिकेत फेडरल इलेक्शन कमिशन संबंधित राजकीय पक्षांच्या बाबतीत कार्यवाही करते.
अमेरिकेत एखादा पक्ष केवळ राज्य किंवा स्थानिक पातळीवर कार्यरत असेल तर त्याला फेडरल इलेक्शन कमिशनमध्ये नोंदणी करण्याची गरज नाही. परंतु आधीच अस्तित्वात असलेल्या एखाद्या पक्षाची शाखा स्थापन केली असेल आणि संबंधित शाखा निधी गोळा करत असेल किंवा निधी खर्च करत असेल तर संघटनेची नोंदणी फेडरल इलेक्शन कमिशनमध्ये करावी लागते.
अमेरिकेत साधारण दीडशे वर्षांपासून डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिकन पक्षांचा दबदबा दिसून येत आहे. राज्य विधानसभांच्या निवडणुका असोत किंवा राष्ट्रपती निवडणूक प्रत्येक ठिकाणी या दोनच पक्षांचे वर्चस्व दिसून येते. अमेरिकेत या व्यतिरिक्त अन्य पक्ष यशस्वी झालेले नाहीत. सन 1912 मध्ये तत्कालीन राष्ट्रपती थियोडोर रुझवेल्ट यांनी एक राजकीय पक्ष स्थापन केला होता. त्यावेळी त्यांनी 88 इलेक्टोरल मते मिळवली होती. नंतर हा पक्ष पुढील निवडणुकी पर्यंत सुद्धा टिकला नव्हता.
अंबानींचं मोठं पाऊल! चीनला दणका, भारत प्लास्टिकचे जागतिक केंद्र बनणार
अमेरिकी मतदारांना वाटते की हे पक्ष फक्त मते खाण्यासाठी निवडणुकीत उमेदवार उभे करतात. त्यामुळे या पक्षांना मते मिळत नाहीत. तिसरे पक्ष यशस्वी न होण्याचे हे सर्वात मोठे कारण आहे. अमेरिकेचे निवडणूक प्रक्रिया पूर्णपणे द्विपक्षीय व्यवस्थेचे समर्थन करते.
अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक जिंकण्यासाठी भारतातील निवडणुकीप्रमाणे कमीत कमी 50 टक्के मत मिळवणे बंधनकारक नाही. याउलट येथे ज्या उमेदवाराला सर्वाधिक मत टक्का मिळतो त्याला विजयी घोषित केले जाते. अमेरिकेत रिपब्लिकन आणि डेमोक्रॅट दोनच प्रमुख पक्ष आहेत म्हटल्यानंतर मतेही याच दोन पक्षांच्या उमेदवारांना मिळत असतात.