डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्णय घेतलाच! ‘या’ 14 देशांवर नवीन टॅरिफचा भार; दिवसही ठरला..

Donald Trump New Tariffs : अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी (Donald Trump) अखेर 14 देशांवर नवीन व्यापारी टॅक्स (टॅरिफ) लागू करण्याची घोषणा सोमवारी केली. या निर्णयानुसार सर्वाधिक 40 टक्के टॅक्स म्यानमार आणि लाओस या देशावर आकारण्यात येणार आहे. नवीन नियम 1 ऑगस्टपासून लागू होणार आहेत. ट्रम्प यांनी या निर्णयाची माहिती सोशल मीडियावर दिली आहे. या निर्णयाशी संबंधित अधिकृत पत्रे सर्व देशांच्या नेत्यांना पाठवण्यात आली आहेत अशी माहिती त्यांनी दिली. या निर्णयानंतर देशांवरील कराचा भार वाढणार आहे. या देशांतून अमेरिकेत येणाऱ्या वस्तूंवर आता जास्त कर आकारला जाणार आहे.
ट्रम्प यांचा इशारा नेमका काय
ट्रम्प यांनी पाठवलेल्या या पत्रांत एक इशाराही देण्यात आला आहे. जर या देशांनी प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेच्या उत्पादनांवर टॅरिफ वाढवण्याचा निर्णय घेतला तर अमेरिका तितकाच टॅक्स आणखी वाढवील. जर तुम्ही कोणत्याही कारणामुळे टॅरिफमध्ये वाढ केली तर जितका टॅरिफ वाढवला असेल तर आम्ही त्यावर तितकाच टॅक्स आणखी वाढवू असा स्पष्ट इशारा डोनाल्ड ट्रम्प यांनी या पत्रात दिला आहे.
ट्रम्प काही ऐकेनात, ‘त्या’ पत्रांवर सह्या केल्याच; 12 देशांच्या अर्थव्यवस्थांना बसणार जबर दणका
नवीन टॅरिफ अमेरिकेसाठी गरजेचे आहेत जेणेकरून आधीच्या चुकीच्या धोरणांत सुधारणा करता येईल. यामध्ये अमेरिकेवर व्यापरी तोटा थोपण्यात आला होता. या धोरणांत टॅरिफ आणि गैर टॅरिफ समस्यांचा समावेश होता. अमेरिकेवर लादलेला हा व्यापार तोटा अर्थव्यवस्थाच नाही तर देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीनेही धोकादायक होता असे डोनाल्ड ट्रम्प यांचे मत आहे.
जपान अन् दक्षिण कोरियालाच का निवडलं
जपान आणि दक्षिण कोरिया या दोन देशांना सर्वात आधी निवडण्याचं कारण काय? असे विचारले असता व्हाइट हाउसचे प्रेस सचिव कॅरोलाइन लेविट यांनी सांगितले की हा राष्ट्रपतींचा विशेषाधिकार आहे. जे योग्य आहेत अशाच देशांची निवड त्यांनी केली आहे. ट्रम्प प्रशासन अनेक व्यापारी साथीदारांसोबत करारांना अंतिम रुप देण्याच्या जवळ आहेत.
कोणत्या देशांवर किती टॅक्स
म्यानमार 40 टक्के
लाओस 40 टक्के
कंबोडिया 36 टक्के
थायलंड 36 टक्के
बांग्लादेश 35 टक्के
सर्बिया 35 टक्के
इंडोनेशिया 32 टक्के
दक्षिण आफ्रिका 30 टक्के
बोस्निया आणि हर्जेगोविना 30 टक्के
जपान 25 टक्के
कझाकस्तान 25 टक्के
मलेशिया 25 टक्के
दक्षिण कोरिया 25 टक्के
ट्यूनिशिया 25 टक्के
अमेरिकेच्या राजकारणात मोठं वादळ! एलन मस्कने केली नवीन पक्षाची स्थापना, ट्रम्प सरकारला दणका