ट्रम्प काही ऐकेनात, ‘त्या’ पत्रांवर सह्या केल्याच; 12 देशांच्या अर्थव्यवस्थांना बसणार जबर दणका

ट्रम्प काही ऐकेनात, ‘त्या’ पत्रांवर सह्या केल्याच; 12 देशांच्या अर्थव्यवस्थांना बसणार जबर दणका

Donald Trump on Tariff Letters : अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प पु्न्हा (Donald Trump) एकदा टॅरिफ लादण्याच्या तयारीत आहेत. ट्रम्प यांनी शुक्रवारी ट्रेड संदर्भातील पत्रांवर सह्या केल्या. टॅरिफ संदर्भात (Tariff Letters) दिलेली डेडलाइन संपण्याआधी ही पत्रे संबंधित देशांना पाठवण्यात येणार आहेत. या संदर्भात माध्यमांना माहिती देताना ट्रम्प म्हणाले की मी काही पत्रांवर सह्या केल्या आहेत. ही पत्रे आता संबंधित देशांना पाठवण्यात येणार आहेत. कोणत्या देशांना पत्र पाठवण्यात येणार आहेत याची माहिती त्याच दिवशी करण्यात येईल.

विविध मुद्द्यांवर काम करण्यापेक्षा देशांना नोटीसा पाठवणे सोपे आहे. आम्ही युकेच्या (United Nations) बाबतीत हेच धोरण घेतले आणि त्याचे चांगले परिणाम दिसले. चीनच्या (China) बाबतीतही आम्ही असेच केले. मला वाटतं की दोन्ही पक्षांसाठी हे योग्य आहे.

एखादं पत्र पाठवून देणे हे खूप सोपे काम आहे. ज्यात लिहिलेलं असेल की आम्हाला माहिती आहे की काही देशांबरोबरील व्यापारात आम्हाला तोटा होत आहे. तर काही देशांबरोबरच्या व्यापारात फायदा होत आहे. पण त्यांची संख्या खूप कमी आहे. जर तुम्हाला अमेरिकेबरोबर व्यापार करायचा असेल तर तुम्हाला या टॅरिफचा स्वीकार करावाच लागेल.

आयफोन निर्मितीसाठी भारतच फायद्याचा ; डोनाल्ड ट्रम्प यांना वृत्तपत्राने कसे तोंडावर पाडले ?

तैवान ते युरोपिय युनियन, फटका बसणार

तैवानपासून युरोपियन युनियनपर्यंत अनेक (European Union) देशांवर अमेरिकेकडून टॅरिफ लादला जाणार आहे. नेमक्या याच वेळी डोनाल्ड ट्रम्प यांनी हे वक्तव्य केलं आहे. यासंदर्भात ट्रम्प यांनी गुरुवारी सांगितले होते की टॅरिफची रेंज 10 टक्क्यांपासून 70 टक्क्यांपर्यंत राहिल. डोनाल्ड ट्रम्प यांच्या या निर्णयावर जगातील 12 हून अधिक देशांच्या अर्थव्यवस्थांवर विपरीत परिणाम होणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube