Elon Musk Reach China who cancelled India Tour : टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क ( Elon Musk ) हे 21 आणि 22 एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Modi) यांची भेट घेण्यासाठी भारत दौऱ्यावर ( India Tour ) येणार होते. मात्र ऐनवेळी त्यांनी हा दौरा रद्द करण्यात येणार असल्याचं सांगितलं होतं. तर आता भारत दौरा रद्द करणारे इलॉन मस्क थेट चीनला पोहचले आहेत. याचं कारण देखील समोर आलं आहे.
इलॉन मस्क थेट चीनला पोहचले…
भारत दौरा रद्द केल्यानंतर मस्क हे तातडीने रविवारी चीनमध्ये दाखल झाले. मस्क यांच्या चीन दौऱ्यामागे सांगन्यात येणारं कारण म्हणजे चीनमधील स्थानिक कंपन्यांच्या इलेक्ट्रिक वाहनांची विक्री वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे मस्क यांनी तातडीने हा दौरा केला आहे. यावेळी मस्क यांनी चीनचे पंतप्रधान ली कियांग यांची भेट घेतली.
फडणवीस आम्हाला मदत करत असतील तर आम्हीही लोकसभेला…;अभिजीत पाटलांचं मोठं विधान
चायना कौन्सिल फॉर द प्रमोशन ऑफ इंटरनॅशनल ट्रेड यांच्या निमंत्रणावरून मस्क यांनीही भेट दिली. या भेटीमध्ये चीन बरोबर पुढील सहकार्याबाबत चर्चा झाली. तसेच सांगा यामध्ये सात अब्ज डॉलर्सचा कारखाना उभारल्यानंतर 2020 मध्ये चीनमध्ये टेस्लाच उत्पादन सुरू झाले. सध्या चीनमधील इलेक्ट्रिक वाहनांमध्ये टेस्लाच्या गाड्या लोकप्रिय आहेत.
शरद पवारांचा उमेदवार कसा हे माहितीये, पारनेरांना 2019 ची चूक सुधारण्याची संधी; विखेंचा लंकेंना टोला
दरम्यान इलॉन मस्क यांचा दौरा नियोजीत असताना अचानक तो रद्द झाल्याने तर्कवितर्क लावले जात आहेत. कारण मस्क यांच्या भेटीनंतर भारतातील बाजारपेठेच्या भागीदारीबद्दल काहीतरी मोठी घोषणा मस्क करतील अशी चर्चा सुरू होती. मात्र, अचानक मस्क यांचा दौरा रद्द झाला. काही दिवसांपूर्वी संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेतील भारताच्या स्थायी सदस्यत्वाचं इलॉन मस्क यांनी समर्थन केलं होतं. आणि त्यानंतर हा दौरा होत असल्याने भारतातील बाजारपेठेत काही बदल होऊ शकतात अशी शक्यताही वर्तवली जात होती.