Download App

Missing Submarine : ‘फादर्स डे’ ची भेट बापलेकांना पडली महागात; टायटॅनिक पाहायला जायचं नव्हतं पण…

Missing Submarine : 1912 मध्ये बुडालेल्या टायटॅनिक जहाजाचे अवशेष दाखविण्यासाठी पर्यटकांना घेऊन जाणारी टायटन पाणबुडी ही अटलांटिक महासागरात बुडाली आहे. ‘ओशन गेट’ या कंपनीच्या मालकीची असलेल्या ‘टायटन’ असं या पाणबुडीचं नाव होत. 18 जूनला ही पाणबुडी अटलांटिक महासागरात गेली असता 2 तासांतच तिचा संपर्क तुटला होता. त्यानंतर तिचा शोध घेण्यासाठी अथक प्रयत्न करण्यात आले. आता या पाणबुडीतील पाचही जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती या कंपनीने दिली आहे. (Father-Son dead due to Fathers day gift Missing Submarine )

रोबोट, जहाज अन्…; पाकिस्तासह पाच देशांच्या अब्जाधीशांचा शोध युद्धपातळीवर

या पाणबुडीमध्ये पाकिस्तासह पाच देशांच्या अब्जाधीशांचा समावेश होता. यामध्ये सर्वात लहान आहे. तो म्हणजे पाकिस्तानचा उद्योगपती प्रिन्स दाऊद यांच्यासोबत असलेला त्यांचा 19 वर्षांचा मुलगा सुलेमान दाऊद त्यांची या पाणबुडीमध्ये जाण्याची कथा अगदी विदारक ठरली आहे. या घटनेबाबात अमेरिकेच्या कोस्ट गार्डने पुष्टी केल्यानंतर प्रिन्स दाऊद यांची बहिण अजमेह दाऊद यांनी एक वृत्त वाहिनीला आपला भाऊ आणि भाच्याच्या मृत्यूविषयी माहिती दिली.

बेपत्ता पाणबुडीची मालकीण अन् बुडालेलं टायटॅनिकचं कनेक्शन आलं समोर

त्यांनी सांगितले की, 19 वर्षांचा सुलेमान दाऊद आपले वडिल प्रिन्स दाऊद यांच्यासोबत टायटॅनिक पाहायला जाण्यासाठी फारसा उत्सुक नव्हता. तो घाबरला होता. पण रविवारी 18 जूनला फादर्स डे होता. फादर्स डे ची भेट म्हणून त्याला आपल्या वडिलांप्रमाणे आयुष्यातील मोठे साहस अनुभवायचे होते. तो वडिलांसाठी काहीही करू इच्छीत होता. म्हणून तो आपल्या वडिलांच्या साथीने पाणबुडीतून खोल समुद्रात उतरला आणि फादर्स डे लाच वडिल आणि मुलाचा करूण अंत झाला.

पाणबुडीमध्ये बुडालेले पाच जण कोण?

या पाणबुडीमध्ये पाकिस्तासह पाच देशांच्या अब्जाधीशांचा समावेश होता. हमिश हार्डिंग (वय 58 वर्ष) अब्जाधीश हमिश हे ब्रिटनमधील खासगी विमान कंपनी अॅक्शन एव्हिएशनचे प्रमुख आहेत. तर पाकिस्तानचा उद्योगपती प्रिन्स दाऊद आणि सुलेमान दाऊद (वय 48 वर्ष) प्रिन्स दाऊद हे यूकेस्थित पाकिस्तानी केमिकल-टू-एनर्जी कंपनी, अॅग्रो कॉर्पोरेशनचे उपाध्यक्ष आहेत. या प्रवासात प्रिन्स दाऊद यांच्यासोबत त्यांचा 19 वर्षांचा मुलगा सुलेमान दाऊदही आहे. पॉल हेन्री नार्गिओल ‘मिस्टर टायटॅनिक’ म्हणून ओळखले जाणारे पॉल फ्रेंच नौदलात कमांडर राहिले आहेत. तर स्टॉकटन रश, रश हे टायटॅनिकचे हे मिशन पार पाडणाऱ्या ओशन गेटचे मुख्य कार्यकारी आणि संस्थापक आहेत. या पाच जणांचा समावेश होता.

Tags

follow us