Missing Submarine : रोबोट, जहाज अन्…; पाकिस्तासह पाच देशांच्या अब्जाधीशांचा शोध युद्धपातळीवर
Titanic Submarine Update : आपल्यापैकी अनेकांनी टायटॅनिक हा चित्रपट पाहिला असेल. या महाभयंकर जहाचाचा 1912 साली अपघात झाला आणि जवळपास 1500 प्रवाशांना जलसमाधी मिळाली. त्यानंतर आता याच जहाचाचे अवशेष पाहण्यासाठी पाच जणांना घेऊन गेलेली पाणबुडी रविवारपासून बेपत्ता आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या पाणबुडीत कुणी सर्व सामान्य नागरिक नसून अरबपती आहेत. या सर्वांचा शोध युद्धपातळीवर घेतला जात असून, त्यांच्या शोधासाठी रोबोट, जहाज आणि बऱ्याच गोष्टींची मदत घेतली जात असून, पाणबुडीमध्ये आता काहीच तासांचा ऑक्सिजन शिल्लक असल्याचे समोर आले आहे.
अब्जाधीशांच्या शोधण्यासाठी शर्थीचे प्रयत्न
सध्या बेपत्ता पाणबुडी शोधण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, या पाणबुडीची निर्मिती करणाऱ्या कंपनीकडून यातील लोक उपलब्ध ऑक्सिजननुसार कमीत कमी 96 तास जिवंत राहू शकतात. मात्र, आता ही पाणबुडी बेपत्ता होऊन तीन दिवसांचा काळ उलटून गेला आहे. त्यामुळे यातील ऑक्सिजन केवळ आज रात्रीपर्यंतचाच आहे. याशिवाय यात बसवलेल्या बॅटरीचा पुरवठा संपल्यास यातील हीटर्स काम करू शकणार नाहीत. त्यामुळे उष्णता आणि ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे यातील व्यक्तींचा मृत्यू होऊ शकतो.
कोण आहेत बेपत्ता झालेले लोक?
हमिश हार्डिंग
58 वर्षीय अब्जाधीश हमिश हे ब्रिटनमधील खासगी विमान कंपनी अॅक्शन एव्हिएशनचे प्रमुख आहेत. हेमिश यांनी केंब्रिज विद्यापीठातून नॅचरल सायन्सेस आणि केमिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले आहे. याशिवाय ते एक वैमानिक, स्कायडायव्हर आणि एक्सप्लोरर्स क्लबचे विश्वस्त देखील आहे. एवढेच नव्हे तर, हार्डिंग यांनी अंटार्क्टिक लक्झरी टुरिस्ट कंपनी ‘व्हाइट डेझर्ट’मध्येही काम केले आहे. हॅमिश हार्डिंग यांनी दक्षिण ध्रुवावर अनेक दौरे केले आहेत. इतकेच नव्हे तर हार्डिंग गेल्या वर्षी जेफ बेझोस यांच्या ब्लू ओरिजिन कंपनीसोबत अंतराळ प्रवासालाही गेले होते.
पाकिस्तानचा राजकुमार आणि सुलेमान दाऊद
४८ वर्षीय प्रिन्स दाऊद हे यूकेस्थित पाकिस्तानी केमिकल-टू-एनर्जी कंपनी, अॅग्रो कॉर्पोरेशनचे उपाध्यक्ष आहेत. त्यांची कंपनी खत आणि पेट्रोकेमिकल उत्पादनांसाठी ओळखली जाते. याशिवाय एंग्रो कॉर्पोरेशन त्यांच्या अभियांत्रिकी प्रकल्पांसाठीही ओळखली जाते. ही कंपनी पाकिस्तानातील सर्वात मोठी कंपनी आहे.प्रिन्स दाऊद हे किंग चार्ल्सच्या चॅरिटी प्रिन्स ट्रस्ट इंटरनॅशनलचे बोर्ड मेंबर देखील आहेत. या प्रवासात प्रिन्स दाऊद यांच्यासोबत त्यांचा 19 वर्षांचा मुलगा सुलेमान दाऊदही आहे.
देवेंद्र फडणवीस मोठं नेतृत्व, कोणीच डॅमेज करु शकत नाही; बावनकुळेंनी भरला दम
‘मिस्टर टायटॅनिक’ पॉल हेन्री नार्गिओल
‘मिस्टर टायटॅनिक’ म्हणून ओळखले जाणारे पॉल फ्रेंच नौदलात कमांडर राहिले आहेत. गेल्या 35 वर्षांपासून ते टायटॅनिकवर संशोधन करत आहेत. इतकेच नाही तर पॉल हे यापूर्वी टायटॅनिकवरील मोहिमांचा एक भाग होते. 1987 मध्ये टायटॅनिकच्या अवशेषातून काही वस्तू आणण्यात आल्या होत्या. पॉल या संघातील एक भाग होते. त्यावेळी एका मुलाखतीत त्यांनी सांगितले होते की, टायटॅनिकचे अवशेष संपूर्ण अंधारात पडलेले आहे. पॉल यांच्या मते, टायटॅनिकच्या आजूबाजूला अनेक समुद्री जीव राहतात. टायटॅनिक म्हणजे विस्तीर्ण वाळवंटातील हिरवीगार जमीन असल्याचेही ते म्हणाले होते.
स्टॉकटन रश
रश हे टायटॅनिकचे हे मिशन पार पाडणाऱ्या ओशन गेटचे मुख्य कार्यकारी आणि संस्थापक आहेत. 1981 मध्ये वयाच्या 19 व्या वर्षी त्यांनी युनायटेड एअरलाइन्स जेट ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमधून परवाना घेतला. त्यावेळी ते जगातील सर्वात तरुण जेट ट्रान्सपोर्ट पायलट बनले होते. रश यांनी प्रिन्स्टन विद्यापीठातून एरोस्पेस अभियांत्रिकीची पदवी घेतली आहे. याशिवाय कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या बर्कले हास स्कूल ऑफ बिझनेसमधून त्यांनी एमबीएचे शिक्षण पूर्ण केले आहे.
तिकिटांची किंमत 2 कोटींहून अधिक
न्यूयॉर्क टाइम्सच्या रिपोर्टनुसार, टायटॅनिक जहाचाचा ढिगारा पाहण्यासाठी पाणबुडीच्या सहाय्याने जाण्यासाठी बराच खर्च येतो. पाणबुडीच्या या प्रवासासाठीचे तिकिट प्रति व्यक्ती 2 कोटी 28 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे. हा प्रवास सेंट जॉन्स, न्यूफाउंडलँड येथून सुरू होतो. टायटॅनिकच्या अवशेषापर्यंत पोहोचण्यासाठी आणि परत येण्यासाठी एकूण आठ तास लागतात. ओशन गेटच्या वेबसाइटनुसार संबंधित पाणबुडी कंपनीकडे एकूण तीन पाणबुड्या आहेत. पण या तिघांपैकी फक्त टायटनमध्ये टायटॅनिकच्या अवशेषापर्यंत पोहोचण्याची क्षमता आहे. या पाणबुडीचे वजन 10 हजार 432 किलो असून, ही पाणबुडी 13 हजार 100 फूट खोलीपर्यंत जाऊ शकते.
शोधासाठी रोबोट, जहाज अनेक बरचं काही…
बेपत्ता पाणबुडीचा शोध घेण्यासाठी सध्या सर्वच स्तरातून शर्थीचे प्रयत्न केले जात असून, पाणबुडीच्या शोधासाठी यूएस आणि कॅनडाची लष्करी विमानांद्वारे शोध घेत आहेत. याशिवाय C-130 विमाने विशेष कॅमेरे आणि रडार तंत्राचा वापर करून समुद्राच्या तळाचे स्कॅनिंग करत आहेत. याशिवाय कॅनेडियन P-3 सागरी गस्ती विमाने देखील तैनात करण्यात आली आहेत.