देवेंद्र फडणवीस मोठं नेतृत्व, कोणीच डॅमेज करु शकत नाही; बावनकुळेंनी भरला दम

देवेंद्र फडणवीस मोठं नेतृत्व, कोणीच डॅमेज करु शकत नाही; बावनकुळेंनी भरला दम

Chandrashekhar Bawankule : राज्याचे उपमुख्यमंत्री दवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)हे मोठं नेतृत्व आहे. त्यामुळे त्यांना विरोधी पक्षातील किंवा कोणीच डॅमेज करु शकत नाही, अशा प्रकारचा सज्जड दम चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule)यांनी विरोधकांना दिला आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे यवतमाळ दौऱ्यावर आहेत, यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला.

कृषी कर्ज मित्र योजना 2023 चा लाभ कोणाला मिळणार?

यावेळी पत्रकारांनी चंद्रशेखर बावनकुळे यांना राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी केलेल्या मागणीवरुन प्रश्न विचारला त्यावर बावनकुळे म्हणाले की, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष छगन भुजबळ (Chhagan Bhujbal)यांना व्हायचे की अजित पवार (Ajit Pawar)की जयंत पाटील (Jayant Patil)यांना ठेवायचं हा अधिकार शरद पवार यांचा आहे.

भावाच्या सर्व इच्छा पूर्ण होवो; अजितदादांच्या मागणीला सुप्रियाताईंचे समर्थन

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातील घडामोडींवर बोलण्याचा आमचा संबंध नाही. राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरुन शरद पवार यांनी राजीनामा दिल्यावर वाटलं होतं ते राजीनामा परत घेणार नाही कोणाला तरी अध्यक्ष करतील पण त्यांनी तसं केलं नाही. मग मला वाटलं अजित पवार, छगन भुजबळ यांना राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष करतील पण तसं झालं नाही. त्यांच्या पक्षात त्यांनी काय करावं याचा सर्वस्वी त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे.

त्याचवेळी बावनकुळे म्हणाले की, टिफिन बैठकिमध्ये कार्यकर्त्यांची मागणी आलेली आहे की, राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार व्हावा, आमच्या जिल्ह्याला मंत्रिपद मिळावं, त्यांना मी शब्द दिला आहे की, मी कार्यकर्त्यांच्या या भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पोहचवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे यावेळी सांगितले.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होणार यावरुन त्यांना प्रश्न विचारल्यावर त्यांनी सांगितले की, मी काही निवडणूक अधिकारी नाही पण मला असा अंदाज आहे की, साधारण न्यायालयामध्ये केस चालू आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसने कोर्टात केस टाकली आहे. त्याच्यामुळे सरकारकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना विलंब होत नाही. प्रभाग पद्धतीच्या रचनेवर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी कोर्टात केस टाकल्यामुळे निवडणुका लेट होत आहे. त्याचा निकाल उद्या आला तर उद्या निवडणुका लागतील. पण अंदाज आहे की, पुढच्या दोन-तीन महिन्यात निकाल लागला तर ऑक्टोबर महिन्यात निवडणुका होतील असा एक अंदाज यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube