आयटी इंजिनिअरला 14 कोटींना गंडविले ! वेदिका पंढरपूरकरसह तिघे पुणे पोलिसांना सापडले

Vedika Pandharpurkar : आता पुणे पोलिसांच्या (Pune Police आर्थिक गुन्हे शाखेने तिघा आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.

  • Written By: Published:
Vedika Pandharurkar Arrest Pune Police

Pune Police Arrest godwoman Vedika Pandharpurkar and other two: मुलींचा ग्रहदोष बरा करण्याच्या नावाखाली पुण्यातील डोळस कुटुंबीयांची तब्बल 14 कोटी रुपयांची फसवणूक झाली होती. शंकर महाराज अंगात येतात असे सांगून भोंदूबाबासह तिघांनी हा प्रकार घडवून आणला होता. आता पुणे पोलिसांच्या (Pune Police ) आर्थिक गुन्हे शाखेने तिघा आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. तिघांना नाशिकमधून ताब्यात घेऊन पोलिसांनी अटक केलीय. याप्रकरणी स्वतः देव सांगणारी वेदिका पंढरपूरकर, (Vedika Pandharpurkar)कुणाल पंढरपूरकर, मांत्रिक दीपक खडके असे पकडलेल्या तिघांचे नावे आहेत.

मोठी बातमी! पुण्यातील जमीन खरेदीची चौकशी होणारच, शासन आदेश जारी

याप्रकरणी पुण्यातील आयटी इंजिनिअर दीपक डोळस यांनी पोलिसांत तक्रार केली होती. दोन्ही मुलींच्या दोषनिवारण करण्याचे नावाखाली डोळस यांना या तिघांनी अंधश्रद्धेच्या जाळ्यात ओढले होते. परंतु थोडी थिडके नव्हे तर चौदा कोटी रुपये आपल्या बँक खात्यावर वेदिका पंढरपूरकर आणि तिच्या साथादीरांनी घेतले होते. (Pune Police Arrest godwoman Vedika Pandharpurkar and other two)


Video : धनंजय मुंडेंच्या पलटवारानंतर जरांगे पुराव्यांसह मैदानात, मुंडेंची थेट रेकॉर्डिंगच ऐकवली


दीपक डोळस यांच्या कुटुंब कसे अडकले ?

वेदिका पंढरपूरकर हिने तुमच्या मुलींना ग्रहदोष आहे, असे डोळस कुटुंबाला सांगितले. हा दोष दूर करायचा असेल तर तुमचे सगळे पैसे, मालमत्ता माझ्या खात्यात ठेवा असे सांगितले. वेदिका पंढरपूरकर ही स्वतःला शंकर महाराजांचा अवतार असल्याचा सांगत होती. तसेच डोळस यांच्या घरात पूजा अर्चा करत होती. त्यामुळे डोळस कुटुंबाचा तिच्यावर विश्वास बसला. तेथून वेदिका पंढरपूरकरने कुटुंबाला लुटण्याचे ठरविले. त्या डोळस यांना इंग्लंडमधील राहते घर विकण्यास सांगितले.


चौदा कोटी रुपयांना गंडविले !

त्यानंतर सर्व पैसे वेदिका पंढरपूरकरच्या बँक खात्यात जमा केले. या कुटुंबाने सर्व बचत व मालमत्ता विक्रीचे असे चौदा कोटी रुपये पैसे वेदिका हिच्या खात्यात जमा केले. त्यानंतर हे तिघे पसार झाले. संपर्क होत नसल्याने फसवणूक झाल्याचे डोळस कुटुंबीयांच्या लक्षात आले. त्यानंतर पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

follow us