PM Modi America Tour : भर पावसात अमेरिकेकडून पंतप्रधान मोदींना गार्ड ऑफ ऑनर; बायडन दाम्पत्याकडून व्हाईट हाऊसमध्ये स्वागत

PM Modi America Tour : भर पावसात अमेरिकेकडून पंतप्रधान मोदींना गार्ड ऑफ ऑनर; बायडन दाम्पत्याकडून व्हाईट हाऊसमध्ये स्वागत

PM Modi America Tour : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चार दिवसांचा अमेरिका दौरा बुधवारी 21 जूनपासून सुरू झाला आहे. मोदींचा हा दौरा भारतासाठी अनेक अर्थाने ऐतिहासिक ठरणार आहे. या दौऱ्यादरम्यान दोन्ही देशांमध्ये अनेक महत्त्वाचे करार होणार आहेत. मोदींच्या या दौऱ्यासाठी अमेरिकेतील अनिवासी भारतीयदेखील मोठ्या प्रमाणात उत्साही आहेत. PM मोदी 21 जून ते 24 जून या कालावधीत अमेरिकेच्या दौऱ्यावर असून, आज 22 जून रोजी मोदी अमेरिकन संसदेच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित करणार आहेत. आज मोदींच्या अमेरिकन दौऱ्याचा दुसरा दिवस आहे. यावेळी विमानतळावर अमेरिकेकडून पंतप्रधान मोदींना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला त्यानंतर बायडन दाम्पत्याकडून व्हाईट हाऊसमध्ये त्यांचं स्वागत करण्यात आलं. (PM Modi America Tour Guard Of honor Joe Biden First Lady Jill Biden Well come White House)

Monsoon Update : आनंदाची बातमी! उद्यापासून पावसाची शक्यता, 24 जूनपासून जोर वाढणार; हवामान विभागाची माहिती

विमानतळावर अमेरिकेकडून भर पावसात पंतप्रधान मोदींना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. त्यानंतर बायडन दाम्पत्याकडून व्हाईट हाऊसमध्ये त्यांचं स्वागत करण्यात आलं. त्यामुळे आपल्या ट्विटमध्ये मोदींनी असं देकील म्हटलं हा आपल्यावर इंद्रदेवता प्रसन्न आहे. तर हा पुरस्कार देताना मेरिकन सरकारचे वरिष्ठ प्रशासकीय आणि लष्करी अधिकारी उपस्थित होते.

दरम्यान अमेरिकेच्या संसदेला दोनदा संबोधित करणारे ते भारताचे पहिले पंतप्रधान असणार आहेत. यापूर्वी 2016 मध्ये मोदींनी अमेरिकन संसदेला संबोधित केले होते. चर्चिल आणि मंडेला यांच्यासारख्या जगातील काही नेत्यांनी अमेरिकन संसदेला दोनदा संबोधित केले आहे. त्यानंतर अमेरिकन संसदेत संबोधित करणारे मोदी हे जगातील तिसरे नेते ठरणार आहेत.

असा असणार मोदींच्या अमेरिकन दौऱ्याचा दुसरा दिवस :

आज पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्याच द्विपक्षीय चर्चा होणार आहे. मोदी अमेरिकन संसदेच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित करणार आहेत. दरम्यान व्हाईट हाऊसमध्ये स्टेट डीनरचे आयोजन करण्यात येणार आहे. यावेळी बायडन दाम्पत्य आणि व्हाईट हाऊसकडून मोदींना खास भेट देण्यात येणार आहे. ही भेट म्हणजे 20 व्या शतकातील हाताने बनवलेली प्राचीन अमेरिकन बुक गॅलरी असणार आहे. त्याचबरोबर विंटेज कॅमेरा, वाइल्ड लाईफ फोटोग्राफीचे हार्डकव्हर पुस्तक तर यामध्ये आणखी खास म्हणजे फर्स्ट लेडी जिल बायडन यांच्या तर्फे रॉबर्ट फ्रॉस्ट यांच्या कविता संग्रहित कवितांच्या पहिल्या आवृत्तीचे पुस्तक भेट म्हणून दिले जाणार आहे.

Aashadhi Wari 2023 : बीआरएसचे प्रमुख के चंद्रशेखर राव पंढरपूरला जाणार, भगीरथ भालकेंचा पक्षप्रवेश होणार?

त्यानंतर पंतप्रधान मोदी हे फर्स्ट लेडी जिल बायडन यांच्यासोबत एका सांस्कृतिक कार्यकर्मातही दाखल होणार आहेत. यामध्ये भारतीय संगीताचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये धूम स्टुडिओ या भारतीय डान्स स्टुडिओचे कलाकार असणार आहेत. यावेळी भारतीय नृत्यपरंपरेतील आणि संस्कृतीशी संबंधित कार्यक्रम होणार आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube