Monsoon Update : आनंदाची बातमी! उद्यापासून पावसाची शक्यता, 24 जूनपासून जोर वाढणार; हवामान विभागाची माहिती

Monsoon Update : आनंदाची बातमी! उद्यापासून पावसाची शक्यता, 24 जूनपासून जोर वाढणार; हवामान विभागाची माहिती

Maharashtra Rain : निम्मा जून महिना उलटून गेला तरी मृगाच्या पावसाचा अद्यापही थांगपत्ता नाही. मान्सूनचे (Monsoon) यंदा 11 जून रोजी महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन झाले. मात्र, अद्यापही अद्याप पाऊस झालेला नाही. त्यामुळे येऊ घातलेल्या खरीप हंगामाची (Rainy season) अद्याप सुरुवात झाली नाही. कोरडवाहू क्षेत्रात कपाशीच नव्हे तर अन्य वाणांचा दाणाही पडला नाही. त्यामुळे राज्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. मात्र आता यादरम्यान हवामान विभागाने पावसाच्या आगमनाबाबत दिलासादारयक माहिती दिली आहे. ( Maharashtra Rain Monsoon Forecast For Tomorrow will Rainfall in state)

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार उद्या शुक्रवार, 23 जूनला राज्यातील काही भागामध्ये पावसाची शक्यता आहे. यामध्ये कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागात पाऊस बरसू शकतो. तर 24 आणि 25 जूनपासून राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर मराठवाड्यातील काही भागात मेघ गर्जनेसह पावसाची शक्यता आहे.

Aashadhi Wari 2023 : बीआरएसचे प्रमुख के चंद्रशेखर राव पंढरपूरला जाणार, भगीरथ भालकेंचा पक्षप्रवेश होणार?

हवामान विभागाच्या पुणे विभाग प्रमुख के एस होसाळीकर यांनी ट्विट करत ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, 21 Jun:
@RMC_Mumbai & @imdnagpur ने 23 जूनपासून कोकणातील काही भागात, मध्य महाराष्ट्र व विदर्भात ; 24-25 जूनपासून पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज वर्तवला आहे. मराठवाड्यामधील काही भागात मेघ गर्जनेसह पावसाची शक्यता. IMD GFS guidance for 23 -25 June indicates same.

टायटॅनिकचे अवशेष शोधण्यासाठी गेलेल्या पाणबुडीचे काय झाले? ‘इतक्या’ तासांचाच ऑक्सिजन शिल्लक

मान्सून दरवर्षी 1 जूनला केरळमध्ये दाखल होतो, मात्र यंदा तो 7 जूनला दाखल झाला. रविवारी, 11 जून रोजी महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन झाले आहे. त्यानंतर पुढच्या 4, 5 दिवसात राज्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र, महाराष्ट्रात मान्सून सुरू होऊन चार दिवस झाले असले तरी अद्याप पाऊस झालेला नाही. त्यामुळे बळीराजासह लोकांची चिंता वाढली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube