Download App

भारताचा मोठा निर्णय! बांग्लादेशचे होणार कोट्यावधींचे नुकसान; ‘या’ वस्तूंना भारतात NO ENTRY

सरकारच्या विदेश व्यापार महानिदेशालयाने बांग्लादेशातून येणाऱ्या काही वस्तूंच्या आयातीवर बंदी घातली आहे.

India Bangladesh Conflict : ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानला चारीमुंड्या चीत (Operation Sindoor) केल्यानंतर आता भारताने आपला मोर्चा बांग्लादेशकडे वळवला आहे. बांग्लादेशात सत्तापालट (India Bangladesh Conflict) झाल्यापासून भारताची डोकेदुखी वाढली आहे. येथील अंतरिम सरकारचा प्रमुख युनूस सातत्याने भारतविरोधी कारवाया करत आहे. त्यामुळे आता बांग्लादेशला धडा शिकवण्याचा प्लॅन केंद्र सरकारने तयार केला आहे. सरकारच्या विदेश व्यापार महानिदेशालयाने बांग्लादेशातून येणाऱ्या काही वस्तूंच्या आयातीवर बंदी घातली आहे.

केंद्र सरकारचा हा निर्णय तत्काळ प्रभावाने लागू झाला आहे. अधिसूचनेनुसार बांग्लादेशातील तयार कपड्यांची आयात आता फक्त न्हावाशेवा आणि कोलकाता येथील बंदरांच्या माध्यमातून होईल. याव्यतिरिक्त प्रोसेस्ड फूड, फळे, फळांचे स्वाद असणारे कार्बोनेटेड पेय, कापूस आणि सुती दोऱ्यांचे वेस्ट, प्लास्टिक, पीव्हीसी तयार माल, लाकडाचे फर्निचरसहीत अन्य वस्तूंना विशिष्ट बंदर प्रतिबंधांच्या अंतर्गत आणण्यात आले आहे. म्हणजेच या वस्तू आता भारतीय बंदरांत येणार नाहीत. त्यामुळे बांग्लादेशला आता दुसरी व्यवस्था करावी लागणार आहे.

भारताच्या ऑपरेशननं बांग्लादेशही घाबरला; चीनकडून ‘या’ फायटर जेट्सच्या खरेदीचा प्लॅन

भारताच्या आदेशात नेमकं काय

भारताने आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोरममध्ये सर्व भूमी सीमा शुल्क स्टेशन्स (एलसीएस) किंवा एकीकृत स्टेशन्स (आयसीपी) आणि उत्तर बंगालमधील चंगराबांधा, फुलबारीच्या माध्यमातून बांग्लादेशी निर्यातीवर बंदर प्रतिबंध लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रोसेस्ड फूड, फळे, फळांचे स्वाद असणारे कार्बोनेटेड पेय, कापूस आणि सुती दोऱ्यांचे वेस्ट, प्लास्टिक, पीव्हीसी तयार माल, लाकडाचे फर्निचरसहीत अन्य वस्तूंचा यामध्ये समावेश आहे.

बांग्लादेशातू रेडिमेड आयातीसाठी कोणत्याही बंदरावरून परवानगी नाही. फक्त न्हावाशेवा आणि कोलकाता ही दोन बंदरे यातून वगळण्यात आली आहेत. प्रोसेस्ड फूड, फळे, फळांचे स्वाद असणारे कार्बोनेटेड पेय, कापूस आणि सुती दोऱ्यांचे वेस्ट, प्लास्टिक, पीव्हीसी तयार माल, लाकडाचे फर्निचरसहीत अन्य वस्तूंना मेघालय, आसाम, त्रिपुरा आणि मिझोरममध्ये कोणत्याही माध्यमातून बांग्लादेशातून आयात करण्यास परवानगी देण्यात येणार नाही असे स्पष्ट करण्यात आले आहे.

बांग्लादेशला दणका! भारतातून जाणारा व्यापारी मार्ग बंद; मोदी सरकारचा आदेश काय?

भारताने निर्णय का घेतला

याआधी भारताने बांग्लादेशी वस्तूंच्या निर्यातीला देशातील बंदरातून परवानगी दिलेली होती. परंतु, बांग्लादेशने भारतीय निर्यातीवर बंदर निर्बंध लावणे सुरुच ठेवले होते. पूर्वेकडील राज्यांच्या सीमांना लागून असणाऱ्या एलसीएस आणि आयसीपी येथे अशी परिस्थिती होती. या मुद्द्यावर अनेक वर्षांपासून चर्चा सुरू होती.

सरकारचा आदेश सोप्या भाषेत..

बांग्लादेशातून भारतात येणाऱ्या कार्बोनेटेड ड्रिंक्स, फळे, प्रोसस्ड फूड, कॉटन, प्लास्टिक आणि लाकडाचे फर्निचर या वस्तूंच्या आयातीवर बंदी.

भारताच्या पूर्वेकडील राज्यांतील बंदरांवर या वस्तू आता येणार नाहीत.

रेडिमेड वस्तू फक्त न्हावा शेवा आणि कोलकाता या दोनच बंदरांच्या माध्यमातून भारतात येतील.

बांग्लादेशातून येणाऱ्या वस्तूंना आसाम, मेघालय, त्रिपुरा, मेघालय, पश्चिम बंगालमधील चंगराबंधा आणि फुलबारीतील लँड कस्टम स्टेशन, इंटीग्रेटेड चेक पोस्ट येथून नो एन्ट्री.

भारत मार्गे नेपाळ आणि भूतानला जाणाऱ्या बांग्लादेशी वस्तूंवर निर्बंध लागू राहणार नाहीत.

भारत सरकारच्या या निर्बंधांतून मासे, एलपीजी, खाद्यतेल, खडी या वस्तू वगळण्यात आल्या आहेत

follow us