Foreign nationals and Anthropic employees banned to using AI US government directive for national security : अँथ्रोपिक या प्रसिद्ध एआय कंपनीने त्यांचे नवे एआय टुल्सना स्थिगिती दिली आहे. हे आदेश अमेरिकन सरकारने राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर दिले आहे. त्यासाठी अमेरिकन सरकारने राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर निर्देश जारी केले आहेत. त्यानंतर कंपनीने हा निर्णय घेतला आहे.
अँथ्रोपिक कर्मचाऱ्यांना AI वापरण्यास बंदी…
अमेरिकन सरकारने राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित अधिकारांचा वापर करत एक निर्यात नियंत्रण निर्देश जारी केला आहे. या निर्देशानुसार, अमेरिकेच्या आत किंवा बाहेर असलेल्या कोणत्याही परदेशी नागरिकाला, तसेच परदेशी नागरिक असलेल्या Anthropic च्या कर्मचाऱ्यांनाही Fable 5 आणि Mythos 5 या मॉडेल्सचा वापर करण्यास बंदी घालण्यात आली आहे.
The US government, citing national security authorities, has issued an export control directive to suspend all access to Fable 5 and Mythos 5 by any foreign national, whether inside or outside the United States, including foreign national Anthropic employees.
The net effect of…
— Anthropic (@AnthropicAI) June 13, 2026
या आदेशाचा थेट परिणाम असा झाला आहे की, नियमांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी आम्हाला आमच्या सर्व ग्राहकांसाठी Fable 5 आणि Mythos 5 या सेवांचा वापर तात्काळ बंद करावा लागत आहे.मात्र, इतर सर्व Claude मॉडेल्सवरील प्रवेशावर कोणताही परिणाम झालेला नाही आणि त्या सेवा पूर्ववत सुरू राहतील.
या अचानक झालेल्या व्यत्ययाबद्दल आम्ही आमच्या ग्राहकांची दिलगिरी व्यक्त करतो. आमच्या मते, हा काहीसा गैरसमज असल्याची शक्यता आहे आणि शक्य तितक्या लवकर सेवा पुन्हा सुरू करण्यासाठी आम्ही संबंधित यंत्रणांसोबत काम करत आहोत.
