‘शेवटी चीनचा खरा नकाशा सापडला’; मनोज नरवणेंकडून फोटो ट्विट…

आपल्या विस्तारवादी धोरणांसाठी बदनाम असलेल्या चीनचा भारताचे माजी लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी एक फोटो ट्विट करत चांगलाच समाचार घेतल्याचं पाहायला मिळालयं. मनोज नरवणे यांनी चीनच्या नकाशाचा फोटो ट्विट करीत ‘शेवटी कोणालातरी चीनचा खरा नकाशा सापडला’ असं कॅप्शनही दिलं आहे. Finally someone has got the map of China as it really is. pic.twitter.com/8whTfICQNS — Manoj […]

Manaoj Naravane

Manaoj Naravane

आपल्या विस्तारवादी धोरणांसाठी बदनाम असलेल्या चीनचा भारताचे माजी लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी एक फोटो ट्विट करत चांगलाच समाचार घेतल्याचं पाहायला मिळालयं. मनोज नरवणे यांनी चीनच्या नकाशाचा फोटो ट्विट करीत ‘शेवटी कोणालातरी चीनचा खरा नकाशा सापडला’ असं कॅप्शनही दिलं आहे.

मनोज नरवणे यांनी ट्विट केलेल्या नकाशामध्ये रंगीत केलेला नकाशा तिबेटमधील काही भाग दाखवत आहे, त्या भागांवर चीनने आपला असल्याचा दावा केला आहे, चीनकडून काही दिवसांपूर्वीच आपल्या नकाशाची 2023 ची आवृत्ती प्रकाशित केलीयं.

MMA Matrix : टायगर श्रॉफची बहिण कृष्णा श्रॉफचा आशिष शेलारांकडून सन्मान

अरुणाचल प्रदेश आणि अक्साईवर चीनने दावा करणारा नकाशा भारताने नाकारला असून या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवला आहे, चीनच्या या दाव्यावर जपान, मलेशिया, व्हिएतनाम आणि फिलीपिन्स सारख्या अनेक आसियान सदस्य देशांनीही चीनच्या प्रादेशिक दाव्यांवर आणि त्याने जारी केलेल्या नकाशावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

बोगस पिक विमा धारकांना कृषीमंत्री धनंजय मुंडेंचा दणका, पडताळणी करुनच पैसे देणार

दरम्यान, आपल्या विस्तारवादी धोरणांच्या अनुषंगाने चीन अनेक दिवसांपासून तैवानच्या सीमेवर आपल्या प्राणघातक युद्धनौका आणि विमाने तैनात करत असून गेल्या 24 तासांत तैवानने 22 चिनी लष्करी विमाने आणि 20 जहाजे त्यांच्या सीमेजवळ पाहिल्या असल्याचा दावा तैवानकडून करण्यात आला आहे. बीजिंगने या प्रदेशात आपल्या लष्करी हालचाली वाढवल्या असल्याचा विश्वासही तैवानने व्यक्त केला आहे.

Exit mobile version