Frans Rapiest News : होय, मी रेपिस्ट माझ्या पत्नीला डॅग्ज देऊन तब्बल 72 जणांकडून बलात्कार करुन घेतला असल्याची कबुली एका पतीने न्यायालयात दिलीयं. (Frans Rape Case) ही घटना आहे फ्रान्समधली. फ्रान्समध्ये एका 71 वर्षीय पतीने मागील 10 वर्षांत आपल्या पत्नीला ड्रग्ज देऊन 72 जणांकडून बलात्कार घडवून आणल्याचं समोर आलंय. या प्रकरणी न्यायालयात सुनावणी असून सुनावणीदरम्यान, पतीने कबुली दिलीयं.
फडणवीसांची सगळी गणितं फेल करणार; सरपंच-उपसरपंच म्हणत जरांगेंनी घेरलं….
नेमकं प्रकरण काय?
डोमिनिक पोलिकोट नामक पती आणि त्याची पत्नी मागील अनेक वर्षांपासून सोबत राहत होते. मात्र, पती डोमिनिक आपल्या पत्नीला जेवणातून ड्रग्ज देत असत. ड्रग्जच्या नशेनंतर पत्नीला शुद्ध राहत नसत. याच संधीचा फायदा घेत पती वेगवेगळ्या लोकांना बोलावून त्यांना पत्नीवर बलात्कार करायला लावत असतं. मागील 10 वर्षांत जवळपास 72 जणांकडून त्याने पत्नीवर बलात्कार घडवून आणलायं. विशेष म्हणजे याबाबत पत्नीला कसलीही भनक नव्हती.
उलगडा कसा झाला?
एका सुपरमार्केटमध्ये पती डोमिनिकला महिलांच्या स्कर्टचा व्हिडिओ शूट करताना पकडलं होतं. त्याला अटक केल्यानंतर त्याच्या मोबाईलसह घरातील कॉम्पुटरमधून अनेक गोष्टी समोर आल्या. ज्या लोकांकडून पत्नीवर बलात्कार घडवून आणत असत त्यांचे तो अश्लील व्हिडिओ बनवत होता. यासंदर्भातील जवळपास 300 फोटो पोलिस तपासात समोर आले.
Video : राहुल गांधींची जीभ छाटू नका तर, चटके द्या; सेनेनंतर आता भाजप खासदाराचं वादग्रस्त विधान
ओळख उघड करण्यासाठी पीडित पत्नीचा ग्रीन सिग्नल
आपल्या पतीच्या कबुलीनंतर पीडित महिलेने आपली ओळख उघड करण्याची परवानगी दिलीयं. यासोबतच या प्रकरणाची सुनावणी उघडपणे होण्यासही तिने मंजुरी दिलीयं. पतीच्या कबुलीनंतर पीडित महिला न्यायालयात जबाब नोंदवणार आहे. सुनावणीवेळी असलेली प्रत्यक्षदर्शी महिला बर्नाडेटे टेसनेयर यांनी सांगितलं की, 50 वर्षीय जीवनात अशी घटना घडलं कसं शक्य आहे, कोणताही व्यक्ती आपल्या पत्नीसोबत असं कसं करु शकतो, अशी भावना टेसनेयर यांनी व्यक्त केलीयं.
पीडित महिलेकडे या प्रकरणी पोलिसांनी चौकशी केली असता आपला पती एक चांगला माणूस असल्याचं तिने सांगितलं होतं. त्यानंतर पोलिसांनी काही फोटो तिला दाखवले, त्यानंतर पत्नीने पतीला घटस्फोट दिला. आरोपी डोमिनिकव्यतिरिक्त इतर 50 पुरुष सुनावणीला सामोरे जात आहेत. पीडित महिलेच्या मर्जीनूसार संबंध ठेवले असल्याचं या पुरुषांकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान, माणुसकीला काळीमा फासणारी घटना फ्रान्समध्ये घडली असून या प्रकरणाच्या सुनावणीमध्ये आरोपी पती दोषी आढळून आल्यास त्याला 20 वर्षे कारावासाची शिक्षा होणार आहे.