Download App

गौतम अदानींना पुन्हा धक्का, चक्क 3800 कोटी रुपयांच्या प्रकल्पातून कंपनीची माघार, ‘हे’ आहे कारण

Gautam Adani Srilanka Project : देशातील लोकप्रिय उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) यांना पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे.

  • Written By: Last Updated:

Gautam Adani Srilanka Project : देशातील लोकप्रिय उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) यांना पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. पवन ऊर्जा प्रकल्पावर श्रीलंका सरकारने (Sri Lankan Government) दरांवर पुन्हा वाटाघाटी करण्याच्या निर्णयानंतर अदानी ग्रीन एनर्जीने (Adani Green Energy) 442 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स (3,800 कोटी रुपये) च्या पवन ऊर्जा प्रकल्पातून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. नुकतंच अदानी ग्रुपकडून याबाबात घोषणा करण्यात आली आहे.

श्रीलंकेच्या नवीन सरकारने वीज दरांवर पुनर्विचार करण्याच्या निर्णय घेतल्याने आम्ही या प्रोजेक्टमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. अशी घोषणा अदानी ग्रुपकडून करण्यात आली आहे.

अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड (AGEL) ने एका निवेदनात म्हटले आहे की, श्रीलंकेतील अक्षय ऊर्जा (RE) पवन ऊर्जा प्रोजेक्ट आणि दोन ट्रान्समिशन प्रोजेक्टमध्ये पुढील सहभागातून आदरपूर्वक माघार घेण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. असं या निवेदनात म्हटले आहे. तसेच आम्ही श्रीलंकेशी वचनबद्ध आहोत आणि श्रीलंका सरकारची इच्छा असल्यास भविष्यात सहकार्य करण्यास तयार आहोत. असं देखील त्यांनी या निवेदनात म्हटले आहे.

कंपनी पवन ऊर्जेपासून वीज निर्मिती करण्यासाठी आणि वापरकर्त्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ट्रान्समिशन लाईन्स टाकण्यासाठी दोन प्रोजेक्टमध्ये एकूण US$1 अब्ज गुंतवणूक करणार होती. श्रीलंकेचे अध्यक्ष अनुरा कुमार दिसानायके यांच्या नेतृत्वाखालील नवीन सरकारने प्रकल्पाचा आढावा घेण्याचे आदेश दिले होते. खरंतर नवीन सरकारला विजेचा खर्च कमी करायचा होता.

विधानसभेत पराभव, ‘इंडिया’ आघाडीचे पुढे काय होणार? आदित्य ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं

अदानी ग्रुप श्रीलंकेतील कोलंबो येथील सर्वात मोठ्या बंदरातील 700 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सच्या टर्मिनल प्रोजेक्टमध्ये गुंतवणूक करत आहे. AEGL ने मूळतः श्रीलंकेतील मन्नार आणि पूनरी प्रदेशात US$740 दशलक्ष गुंतवणुकीसह 484 मेगावॅट क्षमतेचे दोन पवन ऊर्जा प्रोजेक्ट विकसित करण्याचे नियोजन केले होते.

follow us

संबंधित बातम्या