विधानसभेत पराभव, ‘इंडिया’ आघाडीचे पुढे काय होणार? आदित्य ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं

  • Written By: Published:
विधानसभेत पराभव, ‘इंडिया’ आघाडीचे पुढे काय होणार? आदित्य ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं

Aaditya Thackeray : शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) सध्या दिल्ली दौऱ्यावर असून 12 फेब्रुवारी रात्री त्यांनी लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भेट घेतली आहे. या भेटीमध्ये आदित्य ठाकरे यांनी राहुल गांधी यांच्यासोबत काय चर्चा झाली याबाबत माहिती दिली आहे. ते आज दिल्लीमध्ये आयोजित पत्रकार परीषदेमध्ये बोलत होते.

यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले की, काल मी राहुल गांधी यांची भेट घेतली आहे आणि आज अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांची भेट घेणार आहे. वोटर फ्रॉड आणि ईव्हीएम फ्रॉडमुळे आपली मते कुठे जात आहेत हे कळत नाही. आपण लोकशाहीत राहत आहे असं भासवतोय, हे भासवणं दुर करण्यासाठी आपल्याला एकत्र यावं लागणार असं या पत्रकार परिषदेमध्ये आमदार आदित्य ठाकरे म्हणाले.

पुढे बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, शिवसेना (Shivsena), आप (AAP) किंवा काँग्रेससोबत (Congress) जे झालयं ते उद्या बिहारमध्ये नितीश कुमार (Nitish Kumar) यांच्याबाबत देखील होईल, आरजेडी, चंद्राबाबूयांच्याबरोबर होईल, भाजप (BJP) प्रत्येक स्थानिक पक्ष फोडून भाजपाची सत्ता स्थापन करेल. असं देखील या पत्रकार परिषदेमध्ये आदित्य ठाकरे म्हणाले. तसेच इंडिया आघाडीकडे संयुक्त नेतृत्त्व असून पुढील रणनीती म्हणून इंडिया आघाडीसाठी वरिष्ठ नेते रोडमॅप तयार करणार असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला. तर या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी निवडणूक आयोगावर देखील टीका करत व्हीव्हीपॅटमधील मतांची पावती खाली पडते का? महाराष्ट्रात मतदान कसं वाढलं? हे सांगा. मतदानाच्या शेवटच्या वेळेत टोकन दिलं जातं. मतदारांना किती टोकन दिलं हे आयोगाने सांगा असे प्रश्न उपस्थित केलेत.

तर या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी महायुती सरकारवर देखील जोरदार हल्लाबोल करत सरकार जनतेच्या प्रश्नावर कधी बोलणार असा प्रश्न देखील त्यांनी यावेळी विचारला. महायुतीवर हल्लाबोल करत आदित्य ठाकरे म्हणाले की, तिन्ही पक्षांने फोडाफोडीच्या राजकारणाच्या पुढे जावं. त्यांना ज्यांना घ्यायचे आहेत त्यांना घ्या पण हे सगळं झाल्यानंतर जनतेचे प्रश्न सोडवा, गेले तीन महिन्यातील महाराष्ट्रातील चित्र सगंळ्यानी पाहिलं आहे.

आरोग्य निधीच्या 16 लाख रूपयांचा अपहार; गैरव्यवहार प्रकरणी डॉ. बोरगे, रणदिवे यांना अटक

सुरुवातीला मुख्यमंत्री कोण होणार यामध्ये वेळ गेला त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तारात वेळ गेला आणि आता पालकमंत्रीवरून वाद सुरू आहे पण जनतेच्या प्रश्नांवर कोणी बोलत नाही. असं देखील या पत्रकार परिषदेमध्ये आदित्य ठाकरे म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube