आरोग्य निधीच्या 16 लाख रूपयांचा अपहार; गैरव्यवहार प्रकरणी डॉ. बोरगे, रणदिवे यांना अटक

आरोग्य निधीच्या 16 लाख रूपयांचा अपहार; गैरव्यवहार प्रकरणी डॉ. बोरगे, रणदिवे यांना अटक

Finance Commission fund Fraud Case : अहिल्यानगरमध्ये (Ahilyanagar) शासकीय निधीचा अपहार केल्याचं प्रकरण समोर आलंय. या गैरव्यवहार प्रकरणी डॉ. बोरगे आणि रणदिवे यांना अटक (Medical Health Officer) करण्यात आली आहे. त्यांची 17 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात (Ahilyanagar News) आलीय. तोपर्यंत त्यांचं कामकाज पोलीस कोठडी सरकारी वकील अमित यादव पाहात आहेत.

15 व्या वित्तआयोगाचा 16 लाख 15 हजार रुपयांचा निधी शासकीय खात्यात वर्ग न करता तो निधी स्वतः च्या फायद्यासाठी (Finance Commission fund Fraud) संगनमत करून स्वतः च्या खात्यात वर्ग केला. याबाबत शासनाची फसवणूक केल्या प्रकरणी दोघांविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

पुणे पोलिसांकडून ‘तरंग 2025’चं नियोजन, ‘या’ तारखेला होणार कर्तव्य अन् संस्कृतीचा सन्मान

विजयकुमार महादेव रणदिवे (कंत्राटी लेखा व्यवस्थापक राष्ट्रीय आरोग्य अभियान, महापालिका), डॉ. अनिल अशोक बोरगे (वैद्यकीय आरोग्य अधिकारी, महापालिका), असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. याबाबत डॉ. सतीश बाबुराव राजूरकर (प्र.आरोग्य अधिकारी, महापालिका) यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

15 व्या वित्तआयोगातंर्गत आरोग्य सेवा, विविध उपक्रम महापालिका कार्यक्षेत्रातील नागरिकांसाठी राबविले जातात. येणाऱ्या निधीसाठी स्वतंत्र शासकीय बँक खाते असतात. मात्र. विजयकुमार रणदिवे याने 15 व्या वित्त आयोगाचा आलेला निधी स्वतःच्या बँक खात्यात वर्ग केला. तसेच डॉ. बोरगे यांनी याबाबत कुठलीही उपाययोजना केली नसल्याने त्यांनी संगनमताने हे पैसे वर्ग केले असल्याचं तक्रारीत म्हटलं आहे.

‘मला नातू हवाय…’ चिरंजीवीच्या विधानावर चाहत्यांचा संताप, खूपच भयानक विचार

यासंदर्भात प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. सतीश राजूरकर यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी आरोग्य विभागाच्या संपूर्ण कामकाजाच्या चौकशीचे आदेश दिलेले होते. उपायुक्त विजयकुमार मुंडे, मुख्य लेखा परीक्षक विशाल पवार, प्रभारी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. राजूरकर यांच्या समितीने चौकशी करून आयुक्तांकडे अहवाल सादर केलाय. यामध्ये शासनाच्या वित्त आयोगाचे 15 लाख आणि 16 लाख 50 हजार रुपये विजयकुमार रणदिवे यांच्या खात्यात वर्ग झाल्याचे आढळून आले.

त्यानुसार महापालिकेने कोतवाली पोलिसांकडे तक्रार अर्ज दाखल केला. या अर्जाची 12 फेब्रुवारी रोजी सकाळपासून डॉ. अनिल बोरगे आणि विजयकुमार रणदिवे यांना समोरासमोर बसून चौकशी सुरू होती. चौकशीत त्यांनी पदाचा आणि अधिकाराचा वापर करून स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खात्यातून ऑनलाईन प्रक्रियेद्वारे पैसे कॅनरा बँकेच्या वैयक्तिक खात्यात वर्ग केले. त्या निधीचा स्वतःच्या फायद्यासाठी उपयोग केला असल्याचं समोर आलंय.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube