पुणे पोलिसांकडून ‘तरंग 2025’चं नियोजन, ‘या’ तारखेला होणार कर्तव्य अन् संस्कृतीचा सन्मान

पुणे पोलिसांकडून ‘तरंग 2025’चं नियोजन, ‘या’ तारखेला होणार कर्तव्य अन् संस्कृतीचा सन्मान

Tarang 2025 Program Organized By Pune City Police : पुणे शहर पोलीस (Pune Police) आयुक्तालय अंतर्गत तरंग 2025 या कार्यक्रमाचं (Tarang 2025) आयोजन करण्यात आलंय. कर्तव्य आणि संस्कृतीचा सन्मान पुणे पोलिसांकडून करण्यात आल्याचं पाहायला (Pune News) मिळतंय. संगीतमय उत्साहाचा अभिमान देखील अनुभवायला मिळतोय.

मनोज जरांगेंनी केलं सरकारचं कौतुक; जरांगेंची मोठी मागणी मंजूर, म्हणाले, सरकारने आता…

पुणे शहर पोलीस आयुक्तालय अंतर्गत पोलीस दलामध्ये कार्यरत असलेले पोलीस अधिकारी आणि अंमलदार हे सतत विविध बंदोबस्त, निवडणुका, मोर्चे, अधिवेशन या कारणांमुळे कर्तव्यावर तैनात (Tarang 2025 Program) असतात. त्यामुळे पोलीस अधिकारी अन् अंमलदार समवेत त्यांचे कुटूंबिय देखील ताणतणावामध्ये असतात. मागील 2024 हे वर्षे लोकसभा,विधानसभा निवडणुका विविध महत्वाचे बंदोबस्त, व्हिव्हिआयपी दौरे यामध्ये व्यस्त गेल्याने पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांना त्यांच्या कुटुंबियासोबत आनंदाचे क्षण व्यतित करता यावेत.

उत्साहाचे वातावरण मिळावे, यासाठी पोलीस आयुक्त पुणे शहर यांचे संकल्पनेतुन तरंग-2025 हा मनोरंजनपर कार्यक्रम 15 फेब्रुवारी रोजी सांयकाळी साडेपाच ते दहा वाजेपर्यंत पोलीस मुख्यालय शिवाजीनगर पुणे येथे आयोजित करण्यात आलेला आहे. सदर कार्यक्रमाचे प्रायोजक पुनित बालन (पुनित बालन ग्रुप) हे आहेत.

बीड पोलीस ॲक्शन मोडमध्ये, महादेव मुंडे हत्या प्रकरणाच्या चौकशीसाठी 5 सदस्यीय पथक नियुक्त

तरंग-2025 कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, महाराष्ट्र राज्य तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री मुरलीधर मोहोळ, केंद्रीय राज्यमंत्री, सहकार आणि नागरी विमान वाहतूक चंद्रकांत (दादा) पाटील, मंत्री उच्च आणि तंत्रशिक्षण, संसदीय कार्य, माधुरीताई मिसाळ, राज्यमंत्री नगरविकास, परिवहन, सामाजिक न्याय, वैद्यकीय शिक्षण, अल्पसंख्याक विकास आणि इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमांतर्गत ‘अजय अतुल लाईव्ह’ संगीत रजनी हा मनोरंजनपर कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे. बॉलिवुड आणि मराठी सिने सृष्टीतील कलाकार उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास पुणे शहरातील सर्व शांतता कमिटी, मोहल्ला कमिटी सदस्य आणि इतर महत्वाचे व्यक्ती तसेच सर्व प्रिंट व इलेक्ट्रानिक मिडीयाचे संपादक, प्रतिनिधी यांना देखील आमंत्रित करण्यात आले आहे.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube