‘मला नातू हवाय…’ चिरंजीवीच्या विधानावर चाहत्यांचा संताप, खूपच भयानक विचार

‘मला नातू हवाय…’ चिरंजीवीच्या विधानावर चाहत्यांचा संताप, खूपच भयानक विचार

South Actor Chiranjeevi Controversial Statement : ‘मला नातू हवाय…’ दाक्षिणात्य सुपरस्टार चिरंजीवीच्या (South Actor Chiranjeevi) विधानामुळे चाहते निराश झालेत. त्यामुळे चिरंजीवी सोशल मीडियावर टीकेचा धनी झालाय. अभिनेत्याच्या मुलगा आणि मुलगी यांच्यातील भेदभावाच्या विचारसरणीवर चाहत्यांनी संताप व्यक्त केलाय. राम चरण (Ram Charan) आणि उपासना यांची मुलगी क्लेन कारा कोनिडेला आहे. पण मला आता नातू हवाय, असं चिरंजीवीने म्हटलंय.

‘ब्रह्म आनंदम’ च्या रिलीजपूर्व कार्यक्रमात चिरंजीवीने त्यांचा वारसा पुढे नेऊ शकेल, असा नातू असावा अशी इच्छा व्यक्त केली. हे ऐकून चाहत्यांना मोठा धक्का बसलाय. खरंतर, चिरंजीवीचा मुलगा राम चरण आणि सून उपासना (Chiranjeevi Controversial Statement) यांना एक मुलगी आहे. ज्यांच्यासोबत कुटुंबाचे फोटो अनेकदा दिसतात. चिरंजीवी म्हणाला की, ‘जेव्हा मी घरी असतो तेव्हा मला माझ्या नातवंडांभोवती असल्यासारखे वाटत नाही. मला असं वाटतंय की, मी महिलांनी वेढलेला एक हॉस्टेल वॉर्डन आहे. मी राम चरणलाही सांगतो, की किमान आपल्याला एक मुलगा तरी असावा जो वारसा पुढे नेईल.

“आम्ही महाराष्ट्र लुटणाऱ्यांचं, कुटुंब फोडणाऱ्यांचं कौतुक कधीच केलं नाही”, आदित्य ठाकरेंचा पवारांना टोला

नातवाची इच्छा व्यक्त केल्यानंतर चिरंजीवी (South Star) मात्र अडचणीत सापडलाय. ‘राम चरणची मुलगी माझ्या डोळ्यातलं तेज आहे.’ पण कधीकधी मला भीती वाटते की, पुन्हा मुलगी होईल. हे विधान ऐकून चिरंजीवीचे चाहते आश्चर्यचकित झालेत. एवढा मोठा सुपरस्टार मुलगा आणि मुलगी यात फरक करतो. आजच्या काळातही त्याला अशी इच्छा आहे, असं चाहत्यांकडून म्हटलं जातंय.

शिंदेंच किंगमेकर! सामंत बंधू अन् साळवीत घडवला समेट; पडद्यामागची स्टोरी काय?

एका चाहत्यांने म्हटलंय की, चिंरजीवी असं बोलतील अशी त्याला कधीच अपेक्षा नव्हती. ती मुलगी आहे, तू का घाबरायचं? मुलीही वारसा पुढे चालवतात. तेही चांगल्या पद्धतीने. तर दुसऱ्या एका चाहत्याने लिहिलंय की, ‘हा खूप भयानक विचार आहे. यावरून पुरुष वारसाची किती भूक आहे हे दिसून येते. अशा अनेक कमेंट्स सोशल मीडियावर होत आहेत. चिरंजीवीचं हे वक्तव्य वादाच्या भोवऱ्यात सापडल्याचं दिसतंय.

चिरंजीवीच्याच्या पत्नीचे नाव सुरेखा आहे. त्यांना तीन मुले आहेत, 1 मुलगा आणि 2 मुली. राम चरणला सुष्मिता आणि श्रीजा या दोन बहिणी आहेत. राम चरण आणि उपासना यांचं लग्न 2023 मध्ये झालं होतं. त्यांना क्लेन कारा कोनिडेला नावाची एक मुलगी आहे. तर चिरंजीवीने आता राम चरणला दुसरं अपत्य मुलगा व्हावं, अशी अपेक्षा बोलून दाखवली आहे.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube