साळवींच्या भाजप प्रवेशात कोणी खोडा घातला? भास्कर जाधवांचा सवाल
![साळवींच्या भाजप प्रवेशात कोणी खोडा घातला? भास्कर जाधवांचा सवाल साळवींच्या भाजप प्रवेशात कोणी खोडा घातला? भास्कर जाधवांचा सवाल](https://images.letsupp.com/wp-content/uploads/2025/02/Shivsena_V_jpg--1280x720-4g.webp)
Bhaskar Jadhav On Rajan Salvi : रत्नागिरी जिल्ह्यातील राजापुर विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार राजन साळवी (Rajan Salvi) यांनी उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) मोठा धक्का दिलाय. त्यांनी पक्षाच्या उपनेतेपदाचा राजीनामा दिलाय. ते आज एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याचं समोर येतंय. यावर आता ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांची प्रतिक्रिया समोर आलीय.
आमदार उद्धव ठाकरे राजन साळवींना उद्देशुन म्हणाले की, खंदकात पडून मारण्यापेक्षा इथेच थांबा. तसेच साळवींचा भाजप प्रवेश कोणी थांबवला, कोणी खोडा घातला याची मला कल्पना नसल्याचं देखील भास्कर जाधव यांनी स्पष्ट केलंय. ते म्हणाले की, राजन साळवींनी आहे, तिथे थांबावं. राजन साळवींची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न झालाय.
बीड पोलीस ॲक्शन मोडमध्ये, महादेव मुंडे हत्या प्रकरणाच्या चौकशीसाठी 5 सदस्यीय पथक नियुक्त
साळवींचा भाजप प्रवेश कोणी थांबवला, कोणी खोडा घातला याची मला कल्पना नाही. इथे (शिंदेसेनेत) सुद्धा त्यांच्या पक्षप्रवेशाला अडचण येईल, असं मला वाटतंय. जातील त्यांना जाऊद्या असं सांगण्यापेक्षा, कुठे चाललात तुमचे परतीचे दोर कापलेले आहेत, हे सांगण्याची वेळ आलेली आहे. खंदकात पडून मारण्यापेक्षा इथेच थांबा, आपण लढू आणि बाळासाहेबांची पुण्याई उभी करू हा आत्मविश्वास निर्माण करण्याची गरज असल्याचं भास्कर जाधव यांनी म्हटलंय.
‘जादू तेरी नज़र – डायन का मौसम!’ स्टार प्लस वाहिनी घेऊन येतेय…गूढ दुनिया!
राजापूर मतदारसंघाचे माजी आमदार राजन साळवी यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय. आज दुपारी तीन वाजता हा पक्षप्रवेश सोहळा संपन्न होणार असल्याची माहिती मिळतेय. किरण सामंत बंधूंचा राजन साळवी यांच्या पक्ष प्रवेशाला विरोध होता. किरण सामंत यांनी यंदाच्या विधानसभा निवडणुकीत साळवींना पराभूत केले होतं. त्यामुळंच साळवी भाजपामध्ये जातील, अशी चर्चा सुरू होती. परंतू, अखेर साळवी शिंदे गटात जाणार असल्याचं समोर आलंय.
या सगळ्या घडामोडींवर भास्कर जाधव यांनी मोठं वक्तव्य केलंय. मी एकमेव निष्ठावान, असं राजन साळवी नेहमी म्हणायचे. जेव्हा स्वत:च स्वत:ला बिरूदावली लावतो, सुरूवातीला लोकांना त्यांचं कौतुक वाटतं नंतर चेष्टेचा विषय होतो, असा टोला त्यांनी साळवींना लगावला आहे. तसेच राजन साळवी यांच्या भाजप प्रवेशाला विरोध कोणी केला? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केलाय.