Diwali Holiday in USA : दिवाळी हा सण म्हणजे सणांचा राजा असलेला सण असतो. चैतन्य, मांगल्य, आनंद, उत्साह, फराळ फटाक्यांची आतिषबाजी अशा सगळ्या गोष्टींची रेलचेल या सणाला पाहायला मिळते. तसेच भारताच्या कानाकोपऱ्यातही हा सण तितक्याच उत्साहाने साजरा केल्याचे पाहायला मिळते. तर आज काल दिवाळी य सणाचं अप्रुप परदेशातही पाहायला मिळत. किंबहुना परदेशातील वाढती भारतीयांची संख्या पाहता तिकडे देखील दिवाळी उत्साहाने साजरी केली जाते. त्यासाठी आता परदेश वासियांच्या आनंदात आणखी भर पडणार आहे. कारण अमेरिकन सरकारने शाळांना दिवाळीची सुट्टी जाहीर केली आहे. ( Good News for Indians Diwali Holiday in USA )
दिवाळीमध्ये आता अमेरिकेतही सुट्टी मिळणार आहे. न्यूयॉर्क शहरामध्ये शाळांना दिवाळीनिमित्त सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. दिवाळीचा समावेश शाळांच्या सुट्ट्यांच्या यादीमध्ये करण्यात आला आहे. तशी घोषणा न्यूयॉर्कच्या महापौरांनी केली आहे. त्याचबरोबर आता अमेरिकन सरकारी सुट्टीमध्ये देखील दिवाळीचा समावेश होण्याची शक्यता आहे.
मतदारसंघात या, माझ्याविरुद्ध उभे राहा; देसाईंचे राऊतांना ओपन चॅलेंज!
अमेरिकन संसदेच्या कनिष्ठ सभागृहामध्ये खासदार ग्रेस मेन यांनी दिवाळी डे कायदा विषयी विधेयक मांडलं होतं. कॉंग्रेसने याला मंजुरी दिल्यानंतर हे विधेयक सहीसाठी राष्ट्राध्यक्षांकडे पाठवलं जाणार आहे. त्यामुळे आता अमेरिकन भारतीयांनाही दिवाळीच्या सुट्टीचा आनंद घेता येणार आहे. तर परदेशात देखील ते उत्साहात दिवाळी साजरी करू शकणार आहेत.