दक्षिण अमेरिकन देश गयाना इथल्या एका शाळेच्या वसतिगृहाला अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत 19 विद्यार्थीनींची मृत्यू झाला असून अनेक विद्यार्थीनी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
At lease 20 children lost their lives in a late night fire at a school dorm in the gold mining town of Mahdia in Guyana pic.twitter.com/Aen0ADF6eP
— Gordon Moseley 🇬🇾 (@gomoseley) May 22, 2023
मध्य गयानामधील महिदा शहरात शाळा आहे. या शाळेच्या वसतिगृहाला रात्रीच्यावेळी अचानक भीषण आग लागली. जेव्हा आग लागली तेव्हा वसतिगृहातील सर्व मुली गाढ झोपेत होत्या. त्याचवेळी अचानक आग लागल्याने या दुर्घटनेत एकूण 19 मुलींचा मृत्यू झाला असून अनेक मुली गंभीर जखमी झाल्या आहेत.
या दुर्घटनेचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या घटनेनंतर अग्निशमन दलाच्या गाड्या आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. त्यानंतर घटनेत जखमी झालेल्या मुलींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या शाळेत 12 ते 18 वर्षे वयोगटातील मुलींना सेवा दिली जाते. या घटनेव राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेराल्ड गौव्हिया यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, जेव्हा अग्निशमन दल घटनास्थळी पोहचले होते तेव्हा ही इमारत पूर्णपणे जळून खाक झाली होती. आगीच्या घटनेत गंभीर जखमी झालेल्या मुलींचे पुनर्वसन करण्यात येत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
सुरुवातीला या दुर्घटनेत एकूण 20 मुलींचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती. मात्र, नंतर सरकारने मृतांचा सुधारित आकडा जाहीर केला आहे. सुधारित आकड्यानूसार 19 मुलींचा मृत्यू झाला आहे.
Trimbakeshwar Temple : 100 वर्षांची धूप दाखवण्याची परंपरा दाखवाच, तुषार भोसलेंचं संजय राऊतांना खुलं चॅलेंज
तर या दुर्घटनेत 14 मुलींचा जागीच मृत्यू झाला असून 5 जणांचा रुग्णालयात मृत्यू झाला आहे. तसेच दोन मुलींची प्रकृती गंभीर असून 4 जण गंभीर जखमी आहेत. दुर्घटनेतील 6 जखमी मुलींना जॉर्जटाऊनमधील रुग्णालयात दाखल करण्यात असून इतर 5 जणांवर महाडिया रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली आहे.
दरम्यान, या घटनेनंतर शाळेच्या भिंती फोडून सुमारे 20 विद्यार्थीनींना वाचवण्यात यश आले असून ही आग नेमकी कशामुळे लागली याबाबत अद्याप अस्पष्टताच आहे.